Join us

पर्यटकांसाठी खूशखबर! IRCTC आणि FHRAI कडून शानदार ऑफर, स्वस्तात बुक करा हॉटेल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 10:57 AM

irctc and fhrai join hands choosing quality accommodation across india : आयआरसीटीसी आणि हॉटेल व रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया यांनी हॉटेलमध्ये पर्यटकांना उत्तम निवास व्यवस्था देण्याचा एक करार केला आहे.

ठळक मुद्देया कराराअंतर्गत एफएचआरएआय सदस्य आयआरसीटीसी आणि त्याच्या सहयोगी वेबसाइटच्या मदतीने हॉटेलच्या खोल्या बुकिंगसाठी उपलब्ध करु शकतील.

नवी दिल्ली : जर तुम्हाला पर्यटनाची आवड असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता भारतीय रेल्वे केटरिंग अॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच आयआरसीटीसीच्या (Indian Railway Catering and Tourism Corporation) वेबसाइटद्वारे बुकिंग करत असाल तर तुम्हाला फायदा होणार आहे. आयआरसीटीसी आणि हॉटेल व रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया (Federation of Hotel and Restaurant Associations of India) यांनी हॉटेलमध्ये पर्यटकांना उत्तम निवास व्यवस्था देण्याचा एक करार केला आहे.(irctc and fhrai join hands choosing quality accommodation across india to get more convenient for tourists)

या कराराअंतर्गत एफएचआरएआय सदस्य आयआरसीटीसी आणि त्याच्या सहयोगी वेबसाइटच्या मदतीने हॉटेलच्या खोल्या बुकिंगसाठी उपलब्ध करु शकतील. एका निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, या कराराअंतर्गत, आयआरसीटीसी हॉटेल्सना थ्री-स्टार हॉटेल किंवा त्या समकक्ष हॉटेल्सना देण्यात आलेल्या कमिशनमध्ये दोन टक्के सूट देण्यात येईल. सूट मिळवण्यासाठी हॉटेल एफएचआरएआय किंवा त्याच्या प्रादेशिक संघटनांशी संबंधित होणे आवश्यक आहे.

55,000 पेक्षा जास्त हॉटेल्स निवडण्याची सुविधा…"या करारामुळे आयआरसीटीसी वापरकर्त्यांना देशातील 55,000 पेक्षा जास्त हॉटेलमधून त्यांच्या पसंतीच्या हॉटेलची निवड करण्यास परवानगी मिळेल. या सर्व हॉटेल्स तीन सितारा किंवा त्यावरील श्रेणीची आहेत आणि सर्व मूलभूत सुविधा, स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या आंतरराष्ट्रीय मानकांची पूर्तता करतात", असे एफबीआरएआयचे उपाध्यक्ष गुरबक्षीश सिंग कोहली यांनी सांगितले.

(SBI ची खास सुविधा! आता कागदपत्रांशिवाय घर बसल्या उघडा खातं, जाणून घ्या प्रोसेस... )

टॅग्स :ट्रॅव्हल टिप्सआयआरसीटीसीहॉटेल