Join us

IRCTC चं अ‍ॅप, साईट ठप्प! कापले जातायत पैसे, पण तिकीट होईना बुक; प्रवासी त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 11:00 AM

प्रवाशांना टिकीट बुकिंगवेळी आणि पेमेंट करताना या अडचणी येत असल्याचे दिसत आहे.

IRCTC वरून मंगळवारी रेल्वेचे तिकटीक बुक करताना प्रवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रवाशांना टिकीट बुकिंगवेळी आणि पेमेंट करताना या अडचणी येत असल्याचे दिसत आहे. पैसे कटूनही तिकीट बुक होत नाहीय, अशी तक्रार यूजर्स करत आहेत.

IRCTC च्या म्हणण्यानुसार, तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. महत्वाचे म्हणजे, प्रवाशांना IRCTC च्या अॅप आणि वेबसाईट, अशा दोन्ही ठिकाणी समस्या येत असल्याचे बोलले जात आहे. 

यासंदर्भात IRCTC चे ट्विट करत म्हटले आहे, सिस्टिममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे म्हटले आहे. IRCTC ने म्हटले आहे, "तांत्रीक कारणांमुळे तिकीट सेवा उपलब्ध नाही. आमची टेक्निकल टीम या समस्येत सुधारणा करत आहे. तांत्रिक समस्या व्यवस्थित होताच आम्ही आपल्याला माहिती देऊ."

आयआरसीटीसीवरून तिकीट बुक होत नसल्याने युजर्स तक्रारीही करत आहेत. अभिलाष दाहिया नावाच्या एका युजरने म्हटले आहे, ही समस्या लवकरात लवकर सोडवा. मी तिकीट बुक करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र तिकीट बूक होत नाही. 5 वेळा माझे पैसेही कापले गेले आहेत. पण तिकीट बूक होत नाही. या ट्विटसोबत युजरने स्क्रीन शॉटही जोडला आहे.

 

टॅग्स :आयआरसीटीसीभारतीय रेल्वे