नवी दिल्ली : आता तुम्हाला बसचे तिकीट बुक करण्यासाठी अजिबात काळजी करण्याची गरज नाही. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) च्या ऑनलाइन बस बुकिंग सर्व्हिसद्वारे (Online Bus Booking Service) तुम्ही तुमची आवडती सीट घरी बसून बुक करू शकाल. आयआरसीटीसीने आपल्या टूरिझम पोर्टल (IRCTC Tourism Portal) सोबत बस बुकिंग इंटिग्रेट केले आहे. आता ग्राहक www.bus.irctc.co.in किंवा Rail Connect अॅपवरून बस बुक करू शकतात.
आयआरसीटीसीने जानेवारी 2021 मध्ये ही सेवा सुरू केली. सध्या या माध्यमातून 50 हजारांहून अधिक बसेसच्या बुकिंगची सुविधा उपलब्ध होणार असून, त्यात सरकारी आणि खासगी दोन्ही बसेसचा समावेश आहे. या सेवेअंतर्गत 22 राज्ये आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये सेवा दिली जाणार आहे. यामध्ये ग्राहक आपल्या सोयीनुसार एसी, नॉन एसी आणि स्लीपर बस निवडू शकतात. सीट आणि बोर्डिंग/ड्रॉपिंग पॉइंट देखील निवडले जाऊ शकतात.
असे करू शकता तिकीट बुकिंग...- www.bus.irctc.co.in वर जा.- तुम्हाला कुठून कुठे प्रवास करायचा आहे, ती दोन्ही ठिकाणे निर्धारित केलेल्या स्पेसमध्ये टाका.- प्रवासाची तारीख निवडा आणि क्लिक करा.- यानंतर, प्रवासाचा कालावधी, बस सुटण्याची आणि इच्छित स्थळी पोहोचण्याची वेळ यासह त्या मार्गावर उपलब्ध बसचे पर्याय तुमच्यासमोर येतील.- याशिवाय तिकिटाची किंमत आणि किती सीट्स बुक करायच्या आहेत, याचे डिटेल्स दाखविले जातील.- सीट्स निवडल्यानतंर Proceed to book वर क्लिक करा.- येथे तुम्हाला IRCTC लॉगिन किंवा गेस्ट युजस म्हणून लॉग इन करावे लागेल.- तिकिटाचे शुल्क भरल्यानंतर बसचे तिकीट ऑनलाइन बुक केले जाईल.
एसएमएसद्वारे मिळेल डिटेल्सबस सुटण्याच्या दोन तास आधी बस क्रमांक, संपर्क क्रमांक आणि बोर्डिंग पॉईंट क्रमांक एसएमएसद्वारे पाठविला जाईल. खात्यातून पैसे कापल्यानंतरही तिकीट बुकिंग न झाल्यास 3-5 कामकाजाच्या दिवसांत रक्कम परत केली जाईल. कोणत्याही तक्रारीसाठी किंवा चौकशीसाठी, तुम्ही 1800 110 139 वर संपर्क साधू शकता. एक प्रवासी 10 किलोपर्यंतचे सामान घेऊन जाऊ शकेल. याशिवाय, त्यांना एक लॅपटॉप बॅग, हँडबॅग किंवा 5 किलोपर्यंतची ब्रीफकेस सोबत ठेवता येईल.
तिकीट रद्द करण्याचा मिळेल ऑप्शनकाही कारणास्तव तुम्ही प्रवास करू शकत नसाल तर तुम्ही बसचे तिकीटही रद्द करू शकता. तुम्ही तुमचे बसचे तिकीट ऑनलाइन रद्द करू शकता. तिकिटाचे पैसे 3 ते 4 दिवसात परत केले जातील. याशिवाय, तुमची बस रद्द झाली असली आणि बस चालक इतर कोणतीही बस देऊ शकत नसला तरी तुम्हाला परतावा मिळेल.