Lokmat Money > बिझनेस न्यूज > IRCTC Fake App: रेल्वे तिकीट बुकिंगसाठी तुम्ही IRCTC चे App वापरत असाल तर सावधान! होऊ शकतो खिसा खाली

IRCTC Fake App: रेल्वे तिकीट बुकिंगसाठी तुम्ही IRCTC चे App वापरत असाल तर सावधान! होऊ शकतो खिसा खाली

IRCTC Fake App: तुम्ही जर रेल्वे तिकीट बुकिंग करण्यासाठी IRCTC चे मोबाईल अ‍ॅप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 10:08 AM2024-09-30T10:08:41+5:302024-09-30T10:10:02+5:30

IRCTC Fake App: तुम्ही जर रेल्वे तिकीट बुकिंग करण्यासाठी IRCTC चे मोबाईल अ‍ॅप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

irctc fake app beware online fraud and 4 other big online scams quick heal warns users to be alert | IRCTC Fake App: रेल्वे तिकीट बुकिंगसाठी तुम्ही IRCTC चे App वापरत असाल तर सावधान! होऊ शकतो खिसा खाली

IRCTC Fake App: रेल्वे तिकीट बुकिंगसाठी तुम्ही IRCTC चे App वापरत असाल तर सावधान! होऊ शकतो खिसा खाली

IRCTC Fake App : देशात डिजीटल क्रांती झाल्यापासून सर्व गोष्टी हातातल्या मोबाईलवरुनच होत आहेत. ऑटोच्या पेमेंटपासून विमानाच्या तिकीटापर्यंत सर्वकाही एका क्लिकवर होत आहे. मात्र, याचाच गैरफायदा सायबर भामटे घेऊ लागले आहेत. देशात ऑनलाइन फसवणुकीच्या घटना झपाट्याने वाढत आहेत. दरम्यान, जागतिक सायबर सिक्युरिटी सोल्यूशन प्रोव्हायडर क्विक हील टेक्नॉलॉजीजने (Quick Heal Technologies) सायबर धोक्यांबाबत एक सूचना जारी केली आहे. सायबर हॅकर्सने लोकांना फसवण्यासाठी आता नवीन ट्रप तयार केला आहे. तुम्ही रेल्वे बुकिंग मोबाईल अ‍ॅपद्वारे करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.

फेक IRCTC ॲप (Fake IRCTC App)
IRCTC ही भारतीय रेल्वेची उपकंपनी आहे. या कंपनच्या अ‍ॅपद्वारे कोणताही युजर ट्रेनचे तिकीट ऑनलाइन बुक करू शकतो. तुम्हीही IRCTC अ‍ॅप वापरत असाल तर सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण बाजारात बनावट IRCTC ॲप्स उपलब्ध आहेत, ज्यामुळे तुम्ही फसवणुकीला बळी पडू शकता. या अ‍ॅपच्या मदतीने युजर्सचा फेसबुक आणि गुगल खात्यांचे युजरनेम आणि पासवर्ड चोरले जाऊ शकतात. गुगल ऑथेंटिकेटरवरून कोड ऍक्सेस केला जाऊ शकतो. फोनमध्ये इन्स्टॉल केलेल्या अ‍ॅपवरून ही माहिती मिळू शकते.

बँकिंग रिवॉर्ड ॲप्स
सायबर ठग युजर्सना व्हायरस असलेली एपीके फाइल्स डाऊनलोड करण्याची रणनीती वापरत आहेत. हे स्कॅमर अनेकदा ‘फक्त आजसाठी उपलब्ध’ किंवा ‘शेवटच्या दिवसासाठी!’ अशा ऑफर्स पाठवतात. ‘Sign up now to enjoy free gift worth $$’ असे आकर्षक भेटवस्तूचे मॅसेज करतात. किंवा “KYC अपडेटमुळे तुमचे खाते ब्लॉक केले गेले आहे” असा मॅसेज पाठवून युजर्सला घाबरवलं जातं.

सणासुदीच्या काळात बनावट शॉपिंग वेबसाइट्सचा धोका
सणासुदीच्या काळात, हॅकर्स शॉपिंग वेबसाइट्ससारख्या बनावट वेबसाइट तयार करून वापरकर्त्यांची फसवणूक करतात. सायबर गुन्हेगार व्हॉट्सॲप, एसएमएस आणि ईमेलद्वारे विशेष सणाच्या भेटी म्हणून व्हायरस असलेल्या लिंक पाठवतात. अनेकदा अशा लिंक्समध्ये लहान URL असतात. उदा. shoop.xyz किंवा shop.com अशा यूआरएल असलेल्या लिंक आल्या तर सावध राहा.

गिफ्ट कार्ड स्कॅम (Gift Card Scams)
सायबर घोटाळेबाज लोकांना बक्षिसे जिंकण्यासाठी किंवा गिफ्ट कार्डवर क्लेम करण्यासाठी बनावट संदेश पाठवतात. अशा मॅसेजमध्ये Dear customer congratulations! You have won… अशा मॅसेजसचा समावेश असतो.
 

Web Title: irctc fake app beware online fraud and 4 other big online scams quick heal warns users to be alert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.