Lokmat Money > बिझनेस न्यूज > होळी निमित्त रेल्वे प्रवाशांसाठी IRCTC चा दिलासा; तिकीट बुकिंगसाठी सांगितली नवीन पद्धत

होळी निमित्त रेल्वे प्रवाशांसाठी IRCTC चा दिलासा; तिकीट बुकिंगसाठी सांगितली नवीन पद्धत

Indian Railway Ticket Booking : तुम्ही घरबसल्या ऑनलाइन तिकीट खरेदी करू शकता. यामुळे तुमचा वेळही वाचतो आणि तुम्हाला लवकरात लवकर आरक्षणही मिळते.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 12:31 PM2022-03-12T12:31:27+5:302022-03-12T12:32:23+5:30

Indian Railway Ticket Booking : तुम्ही घरबसल्या ऑनलाइन तिकीट खरेदी करू शकता. यामुळे तुमचा वेळही वाचतो आणि तुम्हाला लवकरात लवकर आरक्षणही मिळते.

irctc indian railway ticket booking rail connect app easy steps for railway ticket booking | होळी निमित्त रेल्वे प्रवाशांसाठी IRCTC चा दिलासा; तिकीट बुकिंगसाठी सांगितली नवीन पद्धत

होळी निमित्त रेल्वे प्रवाशांसाठी IRCTC चा दिलासा; तिकीट बुकिंगसाठी सांगितली नवीन पद्धत

नवी दिल्ली : होळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सणानिमित्त मोठ्या संख्येने लोक शहरातून आपापल्या गावी जातात. अशा परिस्थितीत ट्रेनमध्ये मोठी गर्दी असते. यादरम्यान ट्रेनमध्ये आरक्षणावरूनही खूप वाद-विवाद होताना दिसून येतात. 

बरेच लोक रेल्वे स्टेशनवर जाऊन तिकीट खरेदी करतात. अशा स्थितीत त्यांना गर्दीचा सामना करून लांब रांगेत उभे राहावे लागते. त्यामुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत तुम्ही घरबसल्या ऑनलाइन तिकीट खरेदी करू शकता. यामुळे तुमचा वेळही वाचतो आणि तुम्हाला लवकरात लवकर आरक्षणही मिळते.

बरेच लोक आयआरसीटीसीच्या (IRCTC) वेबसाईटवरून तर काही लोक एजंटच्या माध्यमातून बुकिंग करतात. अशा परिस्थितीत अनेक वेळा आरक्षण फूल होते. या समस्येचे निराकरण करण्यासाठी, आयआरसीटीसीने एका अॅपबद्दल माहिती दिली आहे ज्याद्वारे तुम्ही सणासुदीच्या काळात तत्काळ तिकीट किंवा सामान्य बुकिंग सहजपणे बुक करू शकता. 

होळीच्या सणाला तुम्ही तुमच्या घरी जाण्याचा विचार करत आहात, पण जर तुम्हाला लगेच आरक्षण मिळत नसेल, तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही आयआरसीटीच्या रेल कनेक्ट (Rail Connect) अॅपद्वारे सहजपणे आरक्षण करू शकता. यासाठी तुम्हाला ते Google Play Store किंवा iPhone Store वरून डाउनलोड करावे लागेल.

यानंतर, काही सोप्या स्टेप्स फॉलो करून, तुम्ही सहजपणे रेल्वे तिकीट बुक करू शकाल. फक्त तीन सोप्या पायऱ्यांद्वारे तुम्ही या अॅपद्वारे रेल्वे तिकीट बुकिंग सहज करू शकता. या अॅपद्वारे तुम्ही एका महिन्यात 12 रेल्वे तिकीट बुक करू शकता. तुम्ही नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड इत्यादी कोणत्याही पेमेंट पर्यायाच्या मदतीने बुक करू शकता.

Web Title: irctc indian railway ticket booking rail connect app easy steps for railway ticket booking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.