Lokmat Money > बिझनेस न्यूज > मस्तच! आता ट्रेनमध्ये Whatsapp द्वारे ऑर्डर करू शकता जेवण

मस्तच! आता ट्रेनमध्ये Whatsapp द्वारे ऑर्डर करू शकता जेवण

आता तुम्ही ट्रेनमध्ये तुमच्या सीटवर बसून व्हॉट्सअॅपद्वारे ऑनलाइन जेवण ऑर्डर करू शकता.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2023 05:01 PM2023-02-06T17:01:09+5:302023-02-06T17:03:42+5:30

आता तुम्ही ट्रेनमध्ये तुमच्या सीटवर बसून व्हॉट्सअॅपद्वारे ऑनलाइन जेवण ऑर्डर करू शकता.

irctc know how to order food in train from whatsapp step by step procedure  | मस्तच! आता ट्रेनमध्ये Whatsapp द्वारे ऑर्डर करू शकता जेवण

मस्तच! आता ट्रेनमध्ये Whatsapp द्वारे ऑर्डर करू शकता जेवण

नवी दिल्ली : जर तुम्ही बऱ्याचवेळा ट्रेनमधून प्रवास करत असाल आणि तुम्हाला खाण्या-पिण्यासंदर्भात अडचणी येत असतील. म्हणजेच जर तुम्हाला जेवणासाठी वेळ मिळत नसेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. आता तुम्ही ट्रेनमध्ये प्रवास करतानाही जेवण ऑर्डर करू शकता. यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. त्यापेक्षा आता तुम्ही ट्रेनमध्ये तुमच्या सीटवर बसून व्हॉट्सअॅपद्वारे ऑनलाइन जेवण ऑर्डर करू शकता.

जेवण ऑर्डर करणे आता पूर्वीपेक्षा सोपे आहे. भारतीय रेल्वेचे कॅटरिंग सर्व्हिस आणि टुरिझम अॅप आयआरसीटीसीने (IRCTC) प्रवाशांना अधिक सुविधा दिली आहे. आता प्रवासी आपल्या सीटवर जेवण ऑर्डर करू शकतात. तुम्हाला फक्त विचार करायचा आहे की, तुम्हाला काय खायचे आहे आणि गरम जेवण तुमच्या सीटवर पोहोचवले जाईल. दरम्यान, या सुविधेसाठी आयआरसीटीसीची फूड डिलिव्हरी सर्व्हिस  Zoop ने Jio Haptik सोबत भागीदारी केली आहे. यामुळे प्रवाशांना व्हॉट्सअॅपवर चॅटबॉट सर्व्हिसची सुविधा मिळणार आहे.

जेवण ऑर्डर करण्यासाठी PNR आवश्यक असेल
आयआरसीटीसीची फूड डिलिव्हरी सर्व्हिस Zoop ने Jio Haptik सोबत भागीदारी केली आहे, जेणेकरून प्रवाशांना सीटवर जेवण ऑर्डर करता यावे. या अॅपच्या मदतीने तुम्हाला त्याची सेवा व्हॉट्सअॅपवर मिळणार आहे. व्हॉट्सअॅपवरून जेवण ऑर्डर करण्यासाठी प्रवाशांना फक्त पीएनआर नंबर लागणार आहे. प्रवासी पीएनआर नंबरद्वारे आपले जेवण सहजपणे ऑर्डर करू शकतील. खास गोष्ट म्हणजे जेवण ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला इतर कोणत्याही अॅपची गरज भासणार नाही. म्हणजेच तुम्हाला कोणतेही अतिरिक्त अॅप डाउनलोड करावे लागणार नाही.

चॅटबॉटद्वारे लाभ घेऊ शकता
दरम्यान, फूड ऑर्डर केल्यानंतर तुम्ही चॅटबॉट म्हणजेच व्हर्च्युअल रोबोटद्वारे रिअल टाइम फूड ट्रॅकिंग करू शकाल. याशिवाय चॅटबॉटद्वारे फीडबॅक आणि ऑर्डरशी संबंधित सपोर्टची सुविधाही तुम्हाला मिळणार आबे. ट्रेनमधील प्रवासी यूपीआय (UPI) पेमेंट किंवा नेटबँकिंगद्वारे किंवा रोखीने पैसे भरण्यास सक्षम असतील.

Web Title: irctc know how to order food in train from whatsapp step by step procedure 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.