नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तुम्हीही ट्रेनने प्रवास करत असाल आणि ऑनलाइन ट्रेन तिकीट काढत असाल (Online Rail Tickets Booking Rule) तर आधी ही बातमी नक्की वाचा. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनकडून (IRCTC) ऑनलाइन तिकीट खरेदी करणाऱ्या प्रवाशांना आता मोबाईल आणि ई-मेल व्हेरिफिकेशन (Mobile And e Mail Verification) करावे लागणार आहे. त्यानंतरच तिकीट मिळणार आहे.
रेल्वेचा नियम काय?
कोरोना संसर्गामुळे दीर्घकाळ तिकीट बुकिंग न केलेल्या प्रवाशांसाठी रेल्वेने नवे नियम केले आहेत. अशा लोकांना IRCTC पोर्टलवरून तिकीट खरेदी करण्यासाठी प्रथम त्यांचा मोबाईल नंबर आणि ईमेल व्हेरिफिकेशन करावे लागेल. त्यानंतरच प्रवाशांना तिकीट मिळेल. मात्र, ज्या प्रवाशांनी नियमित तिकीट काढले आहे, त्यांना या प्रक्रियेतून जावे लागणार नाही.
ऑनलाइन तिकीट बुकिंग सेवा
आयआरसीटीसीभारतीय रेल्वे अंतर्गत तिकिटांची ऑनलाइन (e-Ticket) विक्री करते. प्रवासी तिकिटांसाठी या पोर्टलवर लॉगिन आणि पासवर्ड तयार करतात आणि त्यानंतर ऑनलाइन ट्रेन बुकिंगचा लाभ घेतात. लॉगिन पासवर्ड तयार करण्यासाठी, तुम्हाला ईमेल आणि फोन नंबर द्यावा लागेल. म्हणजेच ईमेल आणि फोन नंबरची पडताळणी केल्यानंतरच तुम्ही तिकीट बुक करू शकता.
नियम का तयार करण्यात आला?
कोरोना व्हायरसचा कहर कमी होताच रेल्वे रुळावरून धावू लागल्या. अशा स्थितीत तिकीट विक्रीही वाढली आहे. सध्या 24 तासांत जवळपास आठ लाख रेल्वे तिकीटांचे बुकिंग होत आहे. आयआरसीटीसीच्या दिल्ली मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, कोरोना संसर्गाची पहिली आणि दुसरी लाट आणि त्यापूर्वी पोर्टलवर निष्क्रिय असलेली खाती याची खात्री करण्यासाठी मोबाइल नंबर आणि ईमेल पडताळणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
कसे होते व्हेरिफिकेशन?
जेव्हा तुम्ही आयआरसीटीसीच्या पोर्टलवर लॉग इन करता, तेव्हा व्हेरिफिकेशन विंडो उघडते. त्यावर आधीच रजिस्टर्ड ईमेल आणि मोबाइल नंबर अपलोड करा. आता डावीकडे एडिट आणि उजवीकडे व्हेरिफिकेशनचा ऑप्शन दिसतो. एडिट ऑप्शन निवडून तुम्ही आपला नंबर किंवा ईमेल बदलू शकता. व्हेरिफिकेशनचा ऑप्शन निवडल्यावर, तुमच्या नंबरवर एक ओटीपी (One Time Password) येईल. ओटीपी टाकल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर व्हेरिफाय होतो. त्याचप्रमाणे ईमेलसाठीही व्हेरिफिकेशन करावे लागणार आहे. ईमेलवर आलेल्या ओटीपीद्वारे याची व्हेरिफिकेशन केले जाते.