Lokmat Money > बिझनेस न्यूज > IRCTC कडून शानदार सर्व्हिस लाँच, आता कुठेही उपचार करणे झाले सोपे; जाणून घ्या सविस्तर...

IRCTC कडून शानदार सर्व्हिस लाँच, आता कुठेही उपचार करणे झाले सोपे; जाणून घ्या सविस्तर...

IRCTC offers online medical tourism services : ही सर्व्हिस सुरू करण्यामागे आयआरसीटीसीचा उद्देश प्रवास आणि पर्यटनाला चालना देणे हा आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 01:51 PM2022-10-06T13:51:49+5:302022-10-06T13:58:55+5:30

IRCTC offers online medical tourism services : ही सर्व्हिस सुरू करण्यामागे आयआरसीटीसीचा उद्देश प्रवास आणि पर्यटनाला चालना देणे हा आहे.

irctc offers online medical tourism services how to avail packages | IRCTC कडून शानदार सर्व्हिस लाँच, आता कुठेही उपचार करणे झाले सोपे; जाणून घ्या सविस्तर...

IRCTC कडून शानदार सर्व्हिस लाँच, आता कुठेही उपचार करणे झाले सोपे; जाणून घ्या सविस्तर...

नवी दिल्ली : तुम्हीही अनेकदा ट्रेनने प्रवास करत असाल किंवा आयआरसीटीसी (IRCTC) टूरिंग पॅकेज बुक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC)  ग्राहकांसाठी एक शानदार सर्व्हिस सुरू केली आहे. ही सर्व्हिस सुरू करण्यामागे आयआरसीटीसीचा उद्देश प्रवास आणि पर्यटनाला चालना देणे हा आहे.

आयआरसीटीसीने प्रवास आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी ऑनलाइन मेडिकल टुरिझम सर्व्हिस पॅकेज सुरू केले आहे. यासाठी पायलट प्रोजेक्ट म्हणून आयआरसीटीसीने मेडिको-टेक्निकल ऑनलाइन सर्व्हिस कंपनीशी करार केला आहे. ही कंपनी विविध प्रकारचे मेडिकल व वेलनेस पॅकेज आणि आयआरसीटीसीचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना संपूर्ण बॅक एंड सर्व्हिस देईल.

आयआरसीटीसीकडून सुरु करण्यात येणाऱ्या या सर्व्हिसचा उद्देश वैद्यकीय मूल्यासह प्रवासाचा संपूर्ण अनुभव प्रदान करणे हा आहे. उपचारानंतरच्या सुविधा जसे प्रवास-निवास, वाहतूक आणि वैकल्पिक आरोग्य पॅकेजेसचा समावेश केला आहे.

तुम्हाला या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर आयआरसीटीसीचे पर्यटन पोर्टल www.irctctourism.com/ MedicalTourism वर लॉग इन करावे लागेल. यानंतर तुमच्या गरजांची माहिती द्या आणि एक फॉर्म भरा. निर्धारित कालावधीत तुम्हाला आयआरसीटीसी टीमकडून कॉल येईल. कॉल करणाऱ्या टीमकडून सुविधा आणि बजेटनुसार आजारावरील उपचारांसाठी पर्याय सांगितला जाईल. ग्राहकांना सर्व बॅक-एंड व्यवस्था हाताळण्यास सक्षम करण्यात येईल.

दरम्यान, मेडिकल व्हॅल्यू प्रवासासाठी भारत हे आशियातील सर्वात जास्त मागणी असलेले ठिकाण आहे. देशाने गेल्या काही वर्षांत आधुनिक मेडिकल क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे आणि आधुनिक आरोग्य सेवा, पर्यायी औषध आणि निरोगीपणा यांना जोडून समग्र आरोग्यासाठी एक अनोखी परिसंस्था निर्माण केली आहे.

कार्डियाक बायपास - 1 लाख रुपयांपासून सुरू
ब्रेस्ट सर्जरी - 50,000 रुपयांपासून सुरू
किडनी ट्रान्सप्लांट - 1.5 लाख पासून सुरू
क्रॅनिओटॉमी - 85,000 पासून सुरू 
स्टिरिओटॅक्टिक रेडिओसर्जरी - 1.5 लाख रुपयांपासून सुरू
केमोथेरपी पॅकेज - 5000 रुपयांपासून सुरू
Autologous Stem Cell Transplan - 5 लाख रुपयांपासून सुरू
स्पाइन सर्जरी - 65 हजार रुपयांपासून सुरू
Liver Resection - 45 हजार रुपयांपासून सुरू
प्रोस्टेट सर्जरी - 50 हजार रुपयांपासून सुरू
लॅप्रोस्कोपिक हिस्टरेक्टॉमी/व्हॅरिथेमिस/रॅडिकल - 75 हजार रुपयांपासून सुरू
लॅसिक (दोन्ही डोळे) -  40 हजार रुपयांपासून सुरू

Web Title: irctc offers online medical tourism services how to avail packages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.