नवी दिल्ली : तुम्हीही अनेकदा ट्रेनने प्रवास करत असाल किंवा आयआरसीटीसी (IRCTC) टूरिंग पॅकेज बुक करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनने (IRCTC) ग्राहकांसाठी एक शानदार सर्व्हिस सुरू केली आहे. ही सर्व्हिस सुरू करण्यामागे आयआरसीटीसीचा उद्देश प्रवास आणि पर्यटनाला चालना देणे हा आहे.
आयआरसीटीसीने प्रवास आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी ऑनलाइन मेडिकल टुरिझम सर्व्हिस पॅकेज सुरू केले आहे. यासाठी पायलट प्रोजेक्ट म्हणून आयआरसीटीसीने मेडिको-टेक्निकल ऑनलाइन सर्व्हिस कंपनीशी करार केला आहे. ही कंपनी विविध प्रकारचे मेडिकल व वेलनेस पॅकेज आणि आयआरसीटीसीचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांना संपूर्ण बॅक एंड सर्व्हिस देईल.
आयआरसीटीसीकडून सुरु करण्यात येणाऱ्या या सर्व्हिसचा उद्देश वैद्यकीय मूल्यासह प्रवासाचा संपूर्ण अनुभव प्रदान करणे हा आहे. उपचारानंतरच्या सुविधा जसे प्रवास-निवास, वाहतूक आणि वैकल्पिक आरोग्य पॅकेजेसचा समावेश केला आहे.
तुम्हाला या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर आयआरसीटीसीचे पर्यटन पोर्टल www.irctctourism.com/ MedicalTourism वर लॉग इन करावे लागेल. यानंतर तुमच्या गरजांची माहिती द्या आणि एक फॉर्म भरा. निर्धारित कालावधीत तुम्हाला आयआरसीटीसी टीमकडून कॉल येईल. कॉल करणाऱ्या टीमकडून सुविधा आणि बजेटनुसार आजारावरील उपचारांसाठी पर्याय सांगितला जाईल. ग्राहकांना सर्व बॅक-एंड व्यवस्था हाताळण्यास सक्षम करण्यात येईल.
दरम्यान, मेडिकल व्हॅल्यू प्रवासासाठी भारत हे आशियातील सर्वात जास्त मागणी असलेले ठिकाण आहे. देशाने गेल्या काही वर्षांत आधुनिक मेडिकल क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे आणि आधुनिक आरोग्य सेवा, पर्यायी औषध आणि निरोगीपणा यांना जोडून समग्र आरोग्यासाठी एक अनोखी परिसंस्था निर्माण केली आहे.
कार्डियाक बायपास - 1 लाख रुपयांपासून सुरूब्रेस्ट सर्जरी - 50,000 रुपयांपासून सुरूकिडनी ट्रान्सप्लांट - 1.5 लाख पासून सुरूक्रॅनिओटॉमी - 85,000 पासून सुरू स्टिरिओटॅक्टिक रेडिओसर्जरी - 1.5 लाख रुपयांपासून सुरूकेमोथेरपी पॅकेज - 5000 रुपयांपासून सुरूAutologous Stem Cell Transplan - 5 लाख रुपयांपासून सुरूस्पाइन सर्जरी - 65 हजार रुपयांपासून सुरूLiver Resection - 45 हजार रुपयांपासून सुरूप्रोस्टेट सर्जरी - 50 हजार रुपयांपासून सुरूलॅप्रोस्कोपिक हिस्टरेक्टॉमी/व्हॅरिथेमिस/रॅडिकल - 75 हजार रुपयांपासून सुरूलॅसिक (दोन्ही डोळे) - 40 हजार रुपयांपासून सुरू