Join us

IRCTC-HDFC: ट्रॅव्हल क्रेडिट कार्डसाठी IRCTC आणि HDFC बँक भागीदारी; रुपे नेटवर्कवर असणार आधारित 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2023 6:06 PM

IRCTC-HDFC : नवीन लाँच केलेले को-ब्रँडेड कार्ड एकाच प्रकारात उपलब्ध असणार आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (IRCTC) आणि भारतातील सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक एचडीएफसी (HDFC) यांनी आपल्या भागीदारीत एक को-ब्रँडेड ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड लाँच करण्याची घोषणा केली आहे. हे कार्ड आयआरसीटीसी-एचडीएफसी (IRCTC-HDFC) बँक क्रेडिट कार्ड म्हणून ओळखले जाईल. 

नवीन लाँच केलेले को-ब्रँडेड कार्ड एकाच प्रकारात उपलब्ध असणार आहे. हे केवळ एनपीसीआयच्या रुपे (RuPay) नेटवर्कवर आधारित असणार आहे. तसेच, हे आतापर्यंतचे सर्वात अधिक रिवर्डिंग को-ब्रँडेड क्रेडिट कार्ड असेल, असा दावाही केला जात आहे. हे क्रेडिट कार्ड ग्राहकांना विशेष फायदे आणि आयआरसीटीसी तिकीट वेबसाइट आणि आयआरसीटीसी रेल कनेक्ट अॅपद्वारे (IRCTC Rail Connect App) बुक केलेल्या ट्रेन तिकिटांच्या बुकिंगवर जास्तीत जास्त बचतीच्या सुविधा प्रदान करेल. 

या अंतर्गत आयआरसीटीसी-एचडीएफसी  बँक क्रेडिट कार्डधारकांना आकर्षक जॉइनिंग बोनस, बुकिंगवर सूट आणि देशभरातील रेल्वे स्थानकांवर असलेल्या एक्झिक्युटिव्ह लाउंजपर्यंत पोहोचण्याची सुविधा देईल. या भागीदारीच्या घोषणेवेळी सांगण्यात आले की, प्रवाशांना चांगले मूल्य आणि ग्राहकांना चांगला अनुभव देण्यासाठी दोन आघाडीच्या भारतीय ब्रँडची ताकद एकत्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे कार्ड देशातील कार्ड जारी करण्यात मार्केट लीडरद्वारे स्थापित एचडीएफसी बँकेच्या कौशल्याचा लाभ घेईल. 

रेल्वे प्रवासात प्रवाशांना सर्वश्रेष्ठ-इन-क्लास रिवॉर्ड्स प्रोग्रॉम आणि रेल्वे प्रवाशात आयआरसीटीसीच्या अतुलनीय सेवांचा आनंद मिळेल. दरम्यान, या क्रेडिट कार्डला आयआरसीटीसीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रजनी हसीजा, एचडीएफसी बँकेचे पेमेंट्स, कंझ्युमर फायनान्स, डिजिटल बँकिंग आणि आयटी समूहाचे प्रमुख पराग राव व एनपीसीआयच्या सीओओ  प्रवीणा राय यांच्या उपस्थितीत लाँच करण्यात आले. हा कार्ड लाँचिंगचा कार्यक्रम नवी दिल्लीत आयोजित करण्यात आला होता.

टॅग्स :एचडीएफसीआयआरसीटीसीव्यवसाय