Lokmat Money > बिझनेस न्यूज > IRCTC चा नवा विक्रम, 24 तासात केली 7852 कोटींची कमाई

IRCTC चा नवा विक्रम, 24 तासात केली 7852 कोटींची कमाई

IRCTC चा शेअर सोमवारी ऑल-टाइम हायवर पोहोचला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 09:57 PM2023-12-18T21:57:05+5:302023-12-18T21:57:26+5:30

IRCTC चा शेअर सोमवारी ऑल-टाइम हायवर पोहोचला.

IRCTC Share Price: IRCTC's new record, earned 7852 crores in 24 hours | IRCTC चा नवा विक्रम, 24 तासात केली 7852 कोटींची कमाई

IRCTC चा नवा विक्रम, 24 तासात केली 7852 कोटींची कमाई

IRCTC Share Price: रेल्वे सेक्टरमधील प्रमुख कंपनी IRCTC च्या शेअर्सने सोमवारी विक्रमी उच्चांक गाठला. हा शेअर एका दिवसात तब्बल 14 टक्क्यांनी वधारला आणि दिवस संपेपर्यंत 12 टक्क्यांवर बंद झाला. एवढंच नाही तर IRCTC ने अवघ्या 24 तासांत 7,852 कोटी रुपये कमावले. यामुळे गुंतवणूकदारांनाही मोठा फायदा झाला.

सोमवारी IRCTC चे शेअर्स 782.05 रुपयांवर उघडले. दिवसभराच्या व्यवहारात हे 888.90 रुपयांवर गेले. दुपारी व्यवहार संपल्यावर कंपनीचा शेअर 874.05 रुपयांवर बंद झाला. अशा प्रकारे कंपनीचे शेअर 12.57 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.

24 तासांत 7,852 कोटी रुपये कमावले
IRCTC च्या शेअर्समुळे गुंतवणूकदारांनी एका दिवसात 7,852 कोटी रुपये कमावले. शुक्रवारी बाजार बंद झाला तेव्हा IRCTC चे बाजार भांडवल 62,476 कोटी रुपये होते, तर सोमवारी बाजारातील तेजीच्या काळात ते 70,328 कोटी रुपयांवर पोहोचले. अशा प्रकारे कंपनीच्या गुंतवणूकदारांनी अवघ्या 24 तासांत 7,852 कोटी रुपये कमावले आहेत.

या कारणांमुळे IRCTC चे शेअर्स वधारले
आयआरसीटीसीच्या शेअर्सच्या वाढीमागे अनेक कारणे आहेत. सर्वात मोठे कारण म्हणजे हिवाळ्याच्या सुट्टीत लोक मोठ्या प्रमाणात तिकीट बुक करतात. भारतात रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये IRCTC ची मक्तेदारी आहे. IRCTC च्या साइटला आशिया-पॅसिफिक प्रदेशात सर्वाधिक ट्रॅफिक मिळतो. 

  • दररोज 62 लाख लोक IRCTC साइटवर लॉग इन करतात.
  • दर महिन्याला IRCTC साइटवर 3.45 कोटी व्यवहार होतात.
  • 2022 मध्ये IRCTC वेबसाइट आणि मोबाइल अॅपवर सरासरी 11 लाख तिकिटे बुक करण्यात आली आहेत.
  • IRCTC आपला केटरिंग व्यवसाय वाढवत आहे. 
  • भारतीय रेल्वेने येत्या काही दिवसांत अनेक नवीन गाड्या सुरू करण्याची चर्चा केली आहे, त्याचा फायदा IRCTC ला होईल.

(टीप-शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

Web Title: IRCTC Share Price: IRCTC's new record, earned 7852 crores in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.