नवी दिल्ली : भारतीय रेल्वेची (Indian Railway) सहयोगी कंपनी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनच्या (IRCTC) शेअरची किंमत गुरुवारी 5,000 रुपयांच्या वर गेली आहे. आज बाजार बंद झाल्यावर, आयआरसीटीसीच्या शेअरची किंमत (IRCTC Share Price) 5,485 रुपयांच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचली होती. आयआरसीटीसीचा शेअर 76 रुपयांच्या वाढीसह उघडला आणि नंतर वाढतच गेला. बाजार बंद होईपर्यंत, यामध्ये 11.28 टक्के इतकी मजबूत उडी नोंदवली. (IRCTC share price jumped to rupees 5500 know future trend investment and return share price)
कुठपर्यंत शेअरची किंमत जाऊ शकते?
कंपनीच्या शेअरचा उच्चांक (All-time High) अद्याप येणे बाकी आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. भारतीय रेल्वेची सहयोगी कंपनीचा स्टॉक लवकरच 5,800 रुपयांच्या पातळीवर जाऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. दरम्यान, जुलै-सप्टेंबर 2021 तिमाहीत रेल्वे तिकिटांचे बुकिंग जवळजवळ दुप्पट झाले आहे. त्याचा परिणाम आयआसीटीसीच्या दुसऱ्या तिमाहीच्या निकालांवरही दिसून येईल. ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये कंपनीची जवळजवळ मक्तेदारी आहे. अशा स्थितीत कंपनीच्या शेअर्सची किंमत सतत वाढत राहणे अपेक्षित आहे. याशिवाय, कंपनी हॉस्पिटैलिटी सेगमेंटमध्ये सुद्धा विविधता आणत आहे, ज्यामुळे कंपनीच्या शेअरच्या किमतीला चालना मिळत आहे.
हॉस्पिटॅलिटी बिझिनेसवर लक्ष
आयआरसीटीसी वेगाने हॉस्पिटॅलिटी बिझिनेसवर लक्ष केंद्रित करत आहे. हे हॉटेल, टूर आणि ट्रॅव्हल सर्व्हिस प्रोव्हायडर्स आणि लोकल फूड सप्लायर्स यांच्यासोबत करार करत आहे. आयआरसीटीसी चालत्या गाड्यांमध्ये आपल्या फूड चेन बिझिनेसवरही लक्ष देत आहे. याशिवाय कंपनीने अनेक विमान कंपन्यांशी करारही केला आहे. अशा परिस्थितीत, कंपनीने बाजाराला आश्वासन दिले आहे की, भविष्यात केवळ भारतीय रेल्वेचे ई-तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म म्हणून मर्यादित राहणार नाही, तर एक पूर्ण हॉस्पिटॅलिटी सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून उदयास येईल.
गुंतवणूकदारांनी काय करावे?
चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बगाडिया यांनी गुंतवणूकदारांना सध्याच्या पातळीवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, आयआरसीटीसीच्या शेअर्सना 5,000 रुपयांच्या खाली मजबूत सपोर्ट आहे. ज्यांच्याकडे त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये हा स्टॉक आहे त्यांनी 4950 रुपयांच्या स्टॉप लॉससह गुंतवणूक कायम ठेवावी. अल्पावधीत हा स्टॉक 5,600 ते 5,800 रुपयांच्या स्तरापर्यंत जाऊ शकतो. सध्याच्या स्तरावर यामध्ये पोझिशनल खरेदी करता येते. मात्र, स्टॉप लॉस 4,950 वर कायम ठेवावा पाहिजे.