नवी दिल्ली : जर तुम्ही फिरण्यासाठी विचार करत असाल, तर यावेळी तुम्ही तुमचा दौरा अतिशय अनोख्या पद्धतीने संस्मरणीय बनवू शकता. यासाठी तुम्हाला IRCTC चे टूर पॅकेज घ्यावे लागेल. याद्वारे तुम्ही एक रोमांचक प्रवास करू शकाल. तो म्हणजे लक्झरी क्रूझने समुद्रातून प्रवास.
इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) भारतातील पहिले स्वदेशी क्रूझ लाइनर (Cordelia Cruises) सुरू करणार आहे. आयआरसीटीसीने एका निवेदनात म्हटले आहे की, या क्रूझ लाइनर सेवेसाठी कॉर्डेलिया क्रूझसोबत करार केला आहे.
दरम्यान, कॉर्डेलिया क्रूझचे संचालन M/s Waterways Leisure Tourism Pvt. Ltd करते. या कराराअंतर्गत, कॉर्डेलिया क्रूझ भारतातील या पहिल्या स्वदेशी लक्झरी क्रूझ लाइनला प्रोत्साहन आणि मार्केटिंग करेल.
पॅकेज बद्दल जाणून घ्या ..
- आजपासून सुरू होणाऱ्या क्रूझ ट्रिपबद्दल बोलायचे झाले तर याचा कालावधी 5 रात्री 6 दिवस आहे. या ट्रिपची सुरुवात 20 सप्टेंबरला होणार आहे आणि पॅकेजची सुरवातीची किंमत 23,467 रुपये आहे. मुंबईहून ही क्रूझ पकडून तुम्ही दक्षिण भारतातील दोन पर्यटन स्थळांना भेट देऊ शकता.
- यापैकी पहिला केरळ डिलाईट आहे, ज्याचा कालावधी 2 रात्री 3 दिवस आहे. या प्रवासाची तारीख 20 सप्टेंबर आहे. हे पॅकेज 19,898 रुपयांपासून सुरू होते.
- दुसरा रुट्स म्हणजे Sundowner ते Goa रुट्सचा कालावधी 2 रात्री आणि 3 दिवसांचा आहे. या ट्रिपसाठी तारीख 25 सप्टेंबर आहे. या पॅकेजची सुरुवात 23,467 रुपयांपासून होते.
- तर लक्षद्वीपपर्यंतच्या क्रूझचा कालावधी 5 रात्री 6 दिवस आहे. या ट्रिपसाठी तारीख 27 सप्टेंबर आहे. या पॅकेजची सुरुवात 49,745 रुपयांपासून होते.
18 ऑक्टोबरपासून केरळसाठी विशेष पॅकेज
18 ऑक्टोबरपासून IRCTC केरळसाठी विशेष पॅकेज सुरू करत आहे. या IRCTC पॅकेजचे नाव केरळ डिलाईट क्रूझ टूर (Kerala delights cruise tour)आहे. हे टूर पॅकेज 5 रात्री 6 दिवसांसाठी आहे. म्हणजेच, तुम्हाला 6 दिवस समुद्राच्या मध्यभागी राहण्याची संधी मिळेल. या दौऱ्यात तुम्हाला कोचीन किल्ला, केरळ बीच, मुन्नार इत्यादी ठिकाणी भेट देण्याची संधी मिळेल. या व्यतिरिक्त, तुम्ही Cordelia Cruise वर मनोरंजनाची सर्व साधने देखील अनुभवू शकाल.
#IRCTCTourism brings to you the ultimate cruisecation on #India's first premium cruise liner, #Cordelia Cruise. With breathtaking views & world-class services, this city on the sea is everything you've dreamt of & more. #Booking & #details on https://t.co/FWe8nzhxMJ
— IRCTC (@IRCTCofficial) September 14, 2021
IRCTC ने दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही कुटुंबासह प्रवास करत असाल तर दर बऱ्यापैकी किफायतशीर आहे. या पॅकेज अंतर्गत, जर तुम्ही दोन लोकांसोबत गेलात तर तुम्हाला प्रति व्यक्ती 5,3010 रुपये खर्च करावे लागतील. त्याचबरोबर तीन लोकांसाठी प्रति व्यक्ती 50700 रुपये खर्च करावे लागतील.
कसे कराल बुक?
- सर्वात आधी तुम्ही www.irctctourism.com या वेबसाइटला भेट द्या.
- यानंतर होमपेजवर 'क्रूझ' वर क्लिक करा.
- स्थान, प्रस्थान तारीख आणि प्रस्थान कालावधी निवडा.
- येथे तुम्हाला प्रवास आणि भाड्यासह समुद्रपर्यटन तपशील दिसेल.
- वेळापत्रक पाहण्यासाठी प्रवासाच्या तपशीलांवर क्लिक करा.
पोस्ट ऑफिस बचत योजनेत गुंतवणूकदारांना एकच खाते किंवा संयुक्त खाते उघडता येते. त्यासंदर्भात पोस्ट ऑफिस सेव्हिंग स्कीममध्ये संयुक्त खाती असलेल्या गुंतवणूकदारांसाठी सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. #postoffice#investmenthttps://t.co/jbVpQBoEUV
— Lokmat (@MiLOKMAT) September 18, 2021
कोरोना प्रोटोकॉलचे पालन
कोविड -१९ च्या प्रोटोकॉलनुसार, क्रूझ लाइनमधील सर्व क्रू मेंबर्सना पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे. क्रूझ सदस्य दररोज आरोग्य तपासणी करतात आणि क्रूझवर उपलब्ध असलेल्या इतर सुविधांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू प्रत्येक तासाला स्वच्छ करतात. क्रुझवर एअर फिल्टेशनची व्यवस्थाही आहे.