Join us

IRCTC Ticket Booking: झटक्यात रेल्वेचे तिकीट बुक करा! जनरल आणि तात्काळलाही पडतेय भारी, ही ट्रीक वापरा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2022 4:22 PM

IRCTC Ticket Booking by IRCTC eWallet in Marathi: सकाळी १० वाजता एसी आणि ११ वाजता स्लिपर, सिटींग आदींचे तिकीट मिळते. परंतू तिथेही रेल्वे स्टेशनच्या काऊंटरवर रांगा आणि अॅप, वेबसाईटवर तर एजंटांसह लाखांची फौज तयारच बसलेली असते ती वेगळी. त्यांच्यावर मात करत तिकीट कसे काढायचे....

कोरोनानंतर पुन्हा रेल्वे आधीसारखीच सुरु झाल्याने आणि उन्हाळी सुट्या लागल्याने अनेकजण प्रवासाला लागले आहेत. अनेकांनी स्वत:च्या गाड्या नेणे सोयीचे मानले आहे, परंतू ज्यांनी ते शक्य नाही त्यांनी सर्वांचा आवडता ट्रेनचा पर्याय  निवडला आहे. परंतू, समस्या ही आहे की एकतर शंभर, दीडशे वेटिंग दिसतेय किंवा वेटिंगच्याही तिकिटे पार गेली आहेत. अशावेळी तत्काळ तिकीट सेवा खुप उपयोगाची ठरत आहे.

 सकाळी १० वाजता एसी आणि ११ वाजता स्लिपर, सिटींग आदींचे तिकीट मिळते. परंतू तिथेही रेल्वे स्टेशनच्या काऊंटरवर रांगा आणि अॅप, वेबसाईटवर तर एजंटांसह लाखांची फौज तयारच बसलेली असते ती वेगळी. अर्थात ते काही तुमच्याच रुटचे तिकीट काढत असतील असे नाही. परंतू, त्यातील काहीशे तरी नक्कीच असतील. सर्वात बिझी रुटवर सर्वाधिक लोक तिकिट काढायला बसलेले असतात. 

मग त्यांच्यात तुमचा नंबर लागण्यासाठी काय करायचे? सगळ्यांकडे हाय स्पीड नेटवर्क, मोबाईल, डेबिट-क्रेडिट कार्ड, पेटीएम वॉ़लेट वगैरे असतेच की. त्यापेक्षाही फास्ट पेमेंट सिस्टिम आहे, जी तुम्हाला काही सेकंदांत पैसे वळते करते आणि कन्फर्म तिकीट देते. IRCTC वॉलेट, ज्यात आधीच पैसे टाकून ठेवायचे असतात. ही सेवा रेल्वेचीच असते. 

तुम्ही तिकीट, तुमचे नाव निवडल्यावर पेमेंट विंडो येते, त्यावर वॉलेटचे बटन निवडायचे असते. तिथून तुम्ही वॉलेटच्या पेमेंट पेजवर जाता, तिथे तुम्हाला ओटीपी विचारला जातो. सहा आकडी ओटीपी टाकला की लगेचच पैसे वळते होतात आणि तिकीट बुक झाल्याचा मेसेजही येतो. हाच प्रकार डेबिट कार्ड, अन्य वॉलेटद्वारे केल्यास एक-दोन मिनिटांचा वेळ लागतो, तोवर सारी तत्काळ तिकिटे बुक झालेली असतात आणि तुम्हाला त्यातही वेटिंगवर रहावे लागते. 

IRCTC ई-वॉलेटची नोंदणी कशी करावी1: प्रथम, तुमच्या  IRCTC आयडी आणि पासवर्डसह IRCTC मध्ये लॉग इन करा2: तुम्हाला "प्लॅन माय जर्नी" पेजवर IRCTC ई-वॉलेट श्रेणीमध्ये जावे लागेल.3: नंतर "IRCTC eWallet Registration" या लिंकवर क्लिक करा.4: पडताळणीसाठी पॅन किंवा आधार आणि इतर तपशील भरा.5: तुम्ही उपलब्ध पेमेंट पर्यायांपैकी 50 रुपयांचे ऑनलाइन पेमेंट करू शकता.6: तुम्हाला IRCTC ई-वॉलेटमध्ये किमान 100 रुपये जमा करावे लागतील. तिकीट बुकिंगची रक्कम भरण्यासाठी आयआरसीटीसी ई-वॉलेट पेमेंट पर्यायामध्ये इतर बँकांसह दिसेल. 7: त्यानंतर तुम्हाला पासवर्ड प्रोफाईल टाकून 'गो' वर क्लिक करावे लागेल. तुमचे आयआरसीटीसी व़ॉलेट तयार होईल. 

टॅग्स :आयआरसीटीसीभारतीय रेल्वे