Join us  

रेल्वे तिकीट विकून व्हा मालामाल; अधिकृत तिकीट एजंट कसे व्हावे? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 12:38 PM

Ticket Booking : अनेकांच्या मनात हा विचार आला असेल की, जेव्हा आपण एजंटमार्फत ट्रेनमध्ये प्रवासासाठी तिकीट काढतो, तर मग आपण स्वतः तिकीट एजंट बनून कमाई का करू शकत नाही.

भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी विविध व्यवस्था करते. ट्रेनमधील प्रवासासाठी, ऑनलाइन तिकीट बुकिंग, स्टेशनवर तिकीट काउंटर, तसेच एजंटद्वारे तिकीट बुकिंगची सुविधा आहे. अनेकांच्या मनात हा विचार आला असेल की, जेव्हा आपण एजंटमार्फत ट्रेनमध्ये प्रवासासाठी तिकीट काढतो, तर मग आपण स्वतः तिकीट एजंट बनून कमाई का करू शकत नाही.

तुम्ही रेल्वेत सामील होऊन तिकीट बुकिंग एजंट बनू शकता आणि लाखो रुपये कमवू शकता. दरम्यान, रेल्वे तिकीट बुकिंगमध्ये आयआरसीटीसीचे (IRCTC) एकतर्फी वर्चस्व आहे. IRCTC ला रेल्वे तिकीट विकण्याचा अधिकार आहे. IRCTC तिकीट बुकिंगसाठी ट्रॅव्हल एजंट नियुक्त करते. या रेल्वे एजंटांचे काम सामान्य लोकांसाठी ट्रेन बुकिंग करणे आहे.यासाठी IRCTC अधिकृत एजंटला कमिशन रक्कमही देते. 

प्रत्येक शहरात IRCTC कडून एजंट नेमले जातात. या एजंटना IRCTC द्वारे लॉगिन आयडी दिले जाते, ज्यावरून ते तिकीट बुक करू शकतात. IRCTC चा अधिकृत एजंट होण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड यांसारख्या आवश्यक कागदपत्रांव्यतिरिक्त, स्टॅम्प पेपरवर करार तयार केला जातो. त्यानंतर आयआरसीटीसीच्या नावाने 20 हजारांचा डिमांड ड्राफ्ट तयार केला जातो, जो बँकेत जमा करावा लागतो. त्यापैकी 10 हजार रुपये सुरक्षा ठेव आहे, जी एजंट आयडी परत केल्यास परत केली जाते. 

याशिवाय, एजंटला त्याच्या आयडीचे नूतनीकरण करण्यासाठी दरवर्षी 5000 रुपये अतिरिक्त भरावे लागतात. IRCTC रेल्वे सेवा एजंट होण्यासाठी, तुम्हाला क्लास पर्सनल डिजिटल प्रमाणपत्र देखील मिळवावे लागेल. खरंतर, प्रत्येक बुकिंगवर IRCTC आपल्या एजंटला कमिशन निश्चित करते. अशा प्रकारे विचार करा की बुकिंगवर फक्त 15 ते 20 रुपये आहेत. काहीवेळा ते अधिक असू शकते, अशा परिस्थितीत, जर आपण कमाईबद्दल बोललो, तर जास्तीत जास्त बुकिंग मिळवणे शक्य आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही एका महिन्यात 70 ते 80 हजार रुपये सहज कमवू शकता.

टॅग्स :रेल्वेआयआरसीटीसी