नवी दिल्ली : आगामी दिवसता तुम्ही फिरण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. भारतीय रेल्वे (Indian Railways) लेह-लडाखसह (Leh-Ladakh) सहा ठिकाणी फिरण्याची संधी उपलब्ध करून देत आहे. यासाठी तुम्हाला फक्त 32 हजार रुपये खर्च करावे लागतील. या ट्रिपची सुरूवात अहमदाबादमधून (Ahmadabad) होणार आहे.
irctctourism.com ने दिलेल्या माहितीनुसार अहमदाबाद ते लेह हा प्रवास इंडिगो विमानाने (Indigo Airlines) केला जाईल. या ट्रिपमध्ये अहमदाबाद-लेह-नुब्रा-तुर्तुक-पँगाँग-लेह- अहमदाबाद या ठिकाणांचा समावेश असेल. तसेच, अहमदाबाद विमानतळावरून तुमचा प्रवास सुरू होईल. लेहमध्ये पोहोचल्यावर हॉटेलमध्ये चेक इन केल्यानंतर तुमच्या ट्रिपला सुरुवात होईल.
IRCTC कडून ट्विट IRCTCने ट्विट (IRCTC Tweet) करून याबाबत माहिती दिली आहे. या ट्रिपला 27 ऑगस्ट 2021 पासून अहमदाबादेतून सुरुवात होणार आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही IRCTC च्या irctctourism.com या वेबसाइटला भेट देऊ शकता.
पहिला दिवसया ट्रिपला अहमदाबाद विमानतळावरून सुरुवात होईल, येथून तुम्ही थेट लेहला पोहोचाल आणि तिथल्या हॉटेलमध्ये चेक इन कराल.
दुसरा दिवसदुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्यानंतर प्रवासाला सुरुवात होईल. त्यानंतर तुम्ही लेह-श्रीनगर हायवेवर असलेल्या प्रेक्षणीय स्थळांना भेटी देत-देत पुढे जाल. याठिकाणी तुम्हाला हॉल ऑफ फेम (Hall of Fame), काली मंदिर आणि गुरुद्वारा पत्थर साहिब पाहायची संधी मिळेल. त्यानंतर शांती स्तुप आणि लेह पॅलेस तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
तिसरा दिवसतिसऱ्या दिवशी नाश्ता केल्यानंतर तुम्ही खारदुंग लातून नुब्रा घाटीच्या (Nubra Vally) दिशेने रवाना व्हाल. या रस्त्याला सर्वोत्तम रस्ता म्हणून ओळखले जाते. वाटेत खार दुंग लाजवळ विशाल पर्वतरांगांचं दर्शन घडेल आणि तुम्ही त्यात मनाने गुंतून जाल. याठिकाणी तुम्ही शिबिरात चेक इन कराल. दुपारच्या जेवणानंतर पुढील प्रवास होईल.
चौथा दिवसचौथ्या दिवशी सकाळचा नाश्ता केल्यानंतर तुम्ही तुरतुकला जाणार आहात. याठिकाणी तुम्हाला तुर्तुक घाटी पाहायला मिळेल. त्यानंतर रात्रीच्या विश्रांतीची सोय तुम्हाला नुब्रा व्हॅलीमध्ये करता येणार आहे.
पाचवा दिवसपाचव्या दिवशी नाश्त्यानंतर पँगाँगसाठी जाल. पँगाँग तलाव (Pangong Lake) हा 120 किलोमीटर लांब आणि 6 ते 7 किलोमीटर रुंद विस्तारलेला असून हे खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. येथील निसर्ग सौंदर्य अप्रतिम आहे. याठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात काही वेळ घालवण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे.
सहावा दिवससकाळी तुम्हाला तलावावरून सूर्योदय पाहायला मिळेल. नाश्ता केल्यानंतर तुम्ही पुन्हा लेहच्या दिशेने प्रवास सुरू होईल. रस्त्यात थिकसे मठ आणि शे पॅलेस तुम्ही पाहयला मिळेल. हॉटेलवर पोहोचल्यावर संध्याकाळी मोकळ्या वेळेत तुम्ही बाजारात जाऊन खरेदी करू शकता.
सातवा दिवससकाळी नाश्ता केल्यानंतर हॉटेलमधून चेकआउट करून अहमदाबादसाठीच्या विमानात बसण्यासाठी तुम्ही लेहच्या विमानतळावर पोहोचाल.
या सुविधा मिळणार नाहीतअहमदाबादमधील विमानतळावर यात्रेकरूंना स्वत: ला पोहोचावे लागेल याठिकाणी पोहोचवण्याची सेवा मिळणार नाही. त्याशिवाय नुब्रा व्हॅलीत उंटावर बसायचे असेल तर त्याचे तुम्हाला स्वतंत्र पैसे (Extra Charge) द्यावे लागतील. ते पैसे या पॅकेजमध्ये नाहीत. हॉटेल भाडे, टिप्स, फोनचे भाडे, कपडे धुण्याचे पैसे आणि वैयक्तिक वापरासंबंधीच्या कुठल्याही सुविधांचा या पॅकेजमध्ये समावेश नाही. तो खर्च तुम्हाला करावा लागेल. कुठल्याही स्मारकात जाण्याची प्रवेश फी आणि तेथील शूटिंग किंवा फोटोग्राफी करण्याची फी तुम्हाला भरावी लागेल. जर तुम्हाला पॅकेजमध्ये दिलेल्या जेवणाव्यतिरिक्त काही पदार्थ घ्यायचे असतील तर त्याचे जास्त पैसे तुम्हालाच भरावे लागतील.