नवी दिल्लीः येत्या 3 ते 4 वर्षांत रेल्वे प्रवासी गाड्या आणि फ्रेट ट्रेन मागणीनुसार धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष (Railway Board Chairman) विनोदकुमार यादव यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार हे सांगितलं आहे. याचा अर्थ असा आहे की, सामान्य प्रवाशांना ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठी प्रतीक्षा तिकिटे (Waiting Ticket) घेण्याची आवश्यकता नाही. जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा आपण सहजपणे ट्रेनमध्ये प्रवास करू शकता. विनोदकुमार यादव म्हणाले की, वर्ष 2023पर्यंत पूर्वोत्तर राज्यातील सर्व राजधान्यांना रेल्वे नेटवर्कनं जोडलं जाणार आहे. कटरा ते बनिहालपर्यंतचा शेवटचा मार्गही डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.सर्वात आधी या मार्गांवर कन्फर्म तिकीट देण्याची तयारी - रेल्वे प्रवाशांना दिल्ली-मुंबई मार्गावर प्रथम कन्फर्म तिकीट मिळणार आहे. रेल्वेने यासाठी पूर्ण तयारी केली आहे. यानंतर आपल्याला दिल्ली-कोलकाता मार्गावर रेल्वेच्या तिकिटाची खात्री करून घेण्याची गरज नाही, कारण रेल्वे या मार्गावर धावणा-या मालगाड्यांसाठी स्वतंत्र ट्रॅक तयार करीत आहे. हे येत्या 2 वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे या मार्गावर ट्रेनचं तिकीट सहज मिळवता येणार आहे.रेल्वेचा वेग वाढल्यास आरामही मिळणार - भारतात दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-हावडा रेल्वे मार्गावर जास्तीत जास्त गाड्यांची गर्दी आहे, त्यामुळे या दोन मार्गांवर धावणा-या गाड्या उशिरानं धावत आहेत. यामुळे प्रवाशांना सर्वाधिक त्रास होतो आहे. म्हणूनच या मार्गांवर धावणा-या गाड्यांचा वेग वाढणार आहे. पुढील 9 महिन्यांत दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-हावडाच्या रुळांवर धावणा-या सर्व गाड्या 130 किमीच्या वेगाने धावू लागतील. संपूर्ण ट्रॅकवर समान वेगामुळे प्रवासी पूर्वीपेक्षा कमी वेळात त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचू शकतील. जेव्हा दिल्ली-मुंबई मार्गावर ट्रेन 160 किमीच्या वेगाने धावेल तेव्हा जवळपास साडेतीन तासांची बचत होईल. दिल्ली-हावडा मार्गावर सुमारे 5 तासांचा वेळ शिल्लक राहील. रेल्वे बोर्डाच्या म्हणण्यानुसार या मार्गांवरील ट्रॅक, सिग्नलिंग आणि दळणवळणाच्या कमतरता दूर केल्या जात आहेत.
हेही वाचा
CoronaVirus : टेन्शन वाढलं! कोरोनावरच्या 'त्या' औषधांनी मोठा धोका; WHOचा गंभीर इशारा
लेहमध्ये बेपत्ता झालेले IES सुभान अली २५ दिवसांनंतरही गायबच, वडिलांचा सरकारवर गंभीर आरोप
रेकॉर्ड ब्रेक! डिझेलची किंमत पुन्हा भडकली, पेट्रोललाही मागे सोडलं
जिओनं दोन सर्वात स्वस्त प्लॅन केले बंद, लगेचच जाणून घ्या...
उलवेत बनावट रॉयल्टी चलनप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल
टाटा सन्सच्या मंडळामध्ये नोएल यांचा होऊ शकतो समावेश
मोदी सरकारच्या 'या' योजनेतून थेट शेतकर्यांच्या खात्यात पाठविले जातात पैसे; जाणून घ्या सर्व काही
इराणचा भारताला आणखी एक दे धक्का! महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून ONGC बाहेर