नवी दिल्ली : सध्या ट्रेनमध्ये प्रवास करणारे बहुतेक लोक तिकीट बुकिंगसाठी ऑनलाइनचा पर्याय निवडताना दिसतात. यासाठी काही लोक आयआरसीटीसीची (IRCTC) वेबसाइट किंवा अॅपद्वारे तिकीट बुकिंग करतात, तर काही एजंटद्वारे बुकिंग करतात. परंतु अनेक वेळा तत्काळ तिकीट काढताना येथून तुमचे बुकिंग होत नाही.
तिकीट बुक करणे होईल सोपे सण किंवा कोणत्याही आपत्कालीन काळात तिकीट काढण्यासाठी अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते. तुम्हाला कधी अशी समस्या आली असेल तर आयआरसीटीसीने (IRCTC) एका अॅपची माहिती दिली आहे. या अॅपद्वारे तिकीट बुक करणे पूर्वीपेक्षा सोपे होईल.
ट्विटर हँडलवर शेअर केली माहितीयाबाबतची माहिती आयआरसीटीसीने (IRCTC) आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केली आहे. आयआरसीटीसीने (IRCTC) ट्विटरवर म्हटले की, आयआरसीटीसी रेल कनेक्ट अॅप (IRCTC Rail Connect App) डाउनलोड केल्यास तुम्हाला तिकीट बुक करण्याची सुविधा मिळेल. दरम्यान, आयआरसीटीसीनुसार (IRCTC), या अॅपमुळे लोकांना कमी वेळेत तिकीट मिळणार आहे.
रेल कनेक्ट अॅपचे फायदे रेल कनेक्ट अॅपद्वारे (Rail Connect App) 3 टप्प्यांत तिकीट बुक केले जाऊ शकते. विशेष म्हणजे हे अॅप 24 तास सेवेसाठी उपलब्ध आहे. याशिवाय या अॅपवर वेळोवेळी सूचनाही मिळतात, ज्यामुळे तुम्ही अपडेट राहता. दरम्यान, आयआरसीटीसी (IRCTC) एका महिन्यात फक्त 6 तिकिटे बुक करण्याची सुविधा देते. पण जर आधार लिंक असेल तर तुम्ही एका महिन्यात 12 तिकिटे बुक करू शकता.