Join us

IRCTC Update: रेल्वे तिकीट बुकिंग अचानक ठप्प! कारण आले समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 12:50 IST

IRCTC Server Down: आयआरसीटीसीची वेबसाईट अचानक ठप्प झाल्याने नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागलं.

सोमवारी (९ डिसेंबर) रेल्वे तिकीट बुक करत असताना नागरिकांना अडचणींना सामोरं जावं लागलं. कारण अचानक IRCTC वेबसाईट अचानक ठप्प झाली. आयआरसीटीसीचे सर्व्हर डाऊन झाल्याने बुकिंगमध्ये समस्या निर्माण झाली. याबद्दल आता आयआरसीटीसी यांनी सविस्तर माहिती दिली आहे. 

IRCTC ची वेबसाईट अचानक ठप्प झाल्याने प्रचंड गोंधळ उडाला. तत्काळ तिकीट बुकिंगची वेळ सुरू होण्याआधीच सर्व्हर डाऊन झाल्याने नागरिकांनी सोशल मीडियावरून आयआरसीटीसीच्या कार्यपद्धतीबद्दल संताप व्यक्त केला. 

लोकांनी सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात आल्यानंतर आयआरसीटीसीने यावर सविस्तर निवेदन केले आहे. मेंटेनन्सचे काम सुरू असल्याने वेबसाईट पुढील एक तास बुकिंग करता येणार नाही, असे आयआरसीटीसीने म्हटले आहे.

आयआरसीटीसीने म्हटले आहे की, मेंटेनन्सचे काम सुरू असल्याने ई-तिकीट सेवा विस्कळीत झाली आहे. पुढील १ तास ही सेवा बंद असेल. त्याचबरोबर मदतीसाठी संपर्क करण्यासाठी संपर्क क्रमांकही जारी केला आहे. तिकीट रद्द करण्यासाठी आणि फाईल टीडीआरसाठी १४६४६ वर संपर्क क्रमांक देण्यात आला आहे. 

आयआरसीटीसीवरून कोट्यवधी लोक तिकीट बुक करतात. पण, सोमवारी ऐन तत्काळ तिकिटाची बुकिंग सुरू होण्यापूर्वी सर्व्हर डाऊन झाल्याने लोकांना त्रासाला सामोरं जावं लागलं. 

भारतीय रेल्वे आणणार नवे अॅप

भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी भारतीय रेल्वे प्रवाशांसाठी नवीन अॅप आणणार आहे. या माध्यमातून प्रवाशांना प्लॅटफॉर्मवरही रेल्वे सेवेबद्दल माहिती आणि सेवा पुरवल्या जाणार आहे. CRIS हे अॅप विकसित केले आणि जानेवारी २०२५ मध्ये लाँच केले जाण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :भारतीय रेल्वेआयआरसीटीसीरेल्वेतंत्रज्ञान