Join us

IREDA च्या शेअरमध्ये आज तुफान तेजी, ३०० पार गेला स्टॉक; एक वृत्त आणि गुंतवणूकदार मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 10:43 AM

IREDA Share Price: सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी इरेडाचे शेअर्स आज फोकसमध्ये आहेत. कंपनीच्या शेअर्समध्ये आज मोठी वाढ झाली. पाहा काय आहे कारण?

IREDA Share Price: सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी इरेडाचे शेअर्स (IREDA Share Price) आज फोकसमध्ये आहेत. याचं कारण म्हणजे कंपनीच्या निव्वळ नफ्यात झालेली वाढ. गेल्या आठवड्यात ही माहिती समोर आली. दमदार तिमाही निकालांमुळे सोमवारी कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली आहे. सोमवारी सकाळी कंपनीच्या शेअरच्या किंमतीत जवळपास ९ टक्क्यांनी वाढ झाली.

आज बीएसईवर कंपनीचा शेअर ३००.९५ रुपयांवर उघडला. थोड्याच वेळात त्यांनी ३१० रुपयांचा उच्चांक गाठला. कंपनीचा हा आतापर्यंतचा उच्चांकी स्तर आहे. सकाळी १०.३० च्या सुमारास कंपनीचा शेअर २९८ रुपयांच्या आसपास व्यवहार करत होता.

किती झालं नेट प्रॉफिट?

एप्रिल ते जून २०२४ या कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा ३० टक्क्यांनी वाढून ३८३.६९ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला २९४.५८ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. एप्रिल ते जून या तिमाहीत इरेडाचं महसुली उत्पन्न वाढून १,५०१.७१ कोटी रुपये झालं, जे गेल्या वर्षी याच तिमाहीत १,१४३.५० कोटी रुपये होतं.

एनपीएमध्येही घसरण

आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा एनपीए ०.९५ टक्क्यांवर आला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत तो १.६१ टक्के होता. ३० जून २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीची निव्वळ संपत्ती ४४.८३ टक्क्यांनी वाढून ९,११०.१९ कोटी रुपये झाली आहे.

नोव्हेंबरमध्ये आलेला आयपीओ

इरेडाचा आयपीओ २१ नोव्हेंबर २०२३ रोजी आला. आयपीओसाठी प्राइस बँड ३०-३२ रुपये प्रति शेअर होता. त्यानंतर कंपनीच्या शेअरच्या किंमतीत १० पटीनं वाढ झाली आहे. ३ दिवसांच्या सब्सक्रिप्शन दरम्यान आयपीओला ४४ पटीहून अधिक सब्सक्रिप्शन मिळालं होतं.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकसरकार