Lokmat Money > बिझनेस न्यूज > इरफान रझाक : एकेकाळी करत होते टेलरच्या दुकानात काम... आज १५००० कोटींची संपत्ती!

इरफान रझाक : एकेकाळी करत होते टेलरच्या दुकानात काम... आज १५००० कोटींची संपत्ती!

Success Story of Irfan Razack : अपार कष्टातून इरफान रझाक यांनी अब्जावधीची कंपनी उभारली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 03:47 PM2024-12-02T15:47:34+5:302024-12-02T15:48:31+5:30

Success Story of Irfan Razack : अपार कष्टातून इरफान रझाक यांनी अब्जावधीची कंपनी उभारली.

irfan razack md of prestige estates projects how become success now networth over 15000 crore, once worked at tailor’s shop | इरफान रझाक : एकेकाळी करत होते टेलरच्या दुकानात काम... आज १५००० कोटींची संपत्ती!

इरफान रझाक : एकेकाळी करत होते टेलरच्या दुकानात काम... आज १५००० कोटींची संपत्ती!

Success Story of Irfan Razack : जिद्द व कठोर मेहनतीच्या जोरावर देशातील अनेक दिग्गज लोकांनी यश संपादन केले आहे. देशातील सर्वात प्रतिष्ठित रिअल इस्टेट प्रोजेक्ट्सपैकी एक असलेल्या प्रेस्टिज इस्टेट प्रोजेक्ट्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक इरफान रझाक (Irfan Razack) यांनीही आपल्या मेहनतीच्या जोरावर मोठे यश मिळवले आणि श्रीमंताच्या यादीत स्थान कमावले आहे. इरफान रझाक यांची यशोगाथा खूपच प्रभावी आहे. 

अपार कष्टातून इरफान रझाक यांनी अब्जावधीची कंपनी उभारली. लहानपणापासून ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक होण्यापर्यंतचा प्रवास त्यांनी केला आहे. आज त्यांचे नाव देशातील आघाडीच्या रिअल इस्टेट व्यावसायिकांमध्ये घेतले जाते. फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीनुसार, त्यांच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे तर इरफान रज्जाकची संपत्ती १.८ अब्ज डॉलर्स (१५२२१ कोटी रुपये) आहे.

इरफान रझाक यांचा जन्म एका व्यापारी कुटुंबात झाला. त्यांचे वडील रझाक सत्तार १९५० च्या दशकात बंगळुरूमध्ये कपड्यांचे आणि टेलरिंगचे छोटे दुकान चालवत होते. त्यावेळी त्यांना इरफान रझाक सुद्धा मदत करत होते. पुढे वडिलांनी प्रेस्टिज ग्रुपची मुहूर्तमेढ रोवली. यानंतर इरफान रझाक यांनी प्रेस्टिज इस्टेट प्रोजेक्ट्सला एका नव्या उंचीवर नेले आणि भारतीय मार्केटमध्ये कंपनीला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. 

कंपनीने आतापर्यंत २८५ प्रोजेक्ट्स यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. सध्या कंपनीकडे विविध क्षेत्रांमधील ५४ प्रोजेक्ट्स सुरू आहेत. इरफान रझाक यांच्या कंपनीचा व्यवसाय देशातील अनेक शहरांमध्ये पसरलेला आहे. बंगळुरू, चेन्नई, कोची, हैदराबाद,मुंबई सारख्या शहरांमध्ये प्रेस्टिज इस्टेटचे प्रोजेक्ट्स आहेत. तसेच, आणखी इतरही शहरांमध्ये प्रेस्टिज इस्टेट प्रोजेक्ट्स नेण्याचे उद्दिष्ट कंपनीचे आहे.

देशातील अब्जाधीशांमध्ये समावेश
फोर्ब्सनुसार, इरफान रझाक यांची एकूण संपत्ती १.८ अब्ज डॉलर्स (१५२२१ कोटी रुपये) आहे. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये कंपनीने १२,९३० कोटी रुपयांची विक्री नोंदवली होती. फोर्ब्सच्या २०२४ च्या जागतिक अब्जाधीशांच्या यादीत इरफान रझाक यांचाही समावेश करण्यात आला आहे.

Web Title: irfan razack md of prestige estates projects how become success now networth over 15000 crore, once worked at tailor’s shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.