Lokmat Money > बिझनेस न्यूज > लोखंडाचे दर २० टक्क्यांनी गडगडले

लोखंडाचे दर २० टक्क्यांनी गडगडले

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्वस्त स्क्रॅप (भंगार) भारतात मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याने, आठ दिवसांत लोखंडांचे दर तब्बल २० टक्क्यांनी गडगडले.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 04:25 AM2019-08-14T04:25:42+5:302019-08-14T04:26:47+5:30

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्वस्त स्क्रॅप (भंगार) भारतात मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याने, आठ दिवसांत लोखंडांचे दर तब्बल २० टक्क्यांनी गडगडले.

Iron prices fell by 20 percent | लोखंडाचे दर २० टक्क्यांनी गडगडले

लोखंडाचे दर २० टक्क्यांनी गडगडले

- संजय खांडेकर
अकोला : आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्वस्त स्क्रॅप (भंगार) भारतात मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याने, आठ दिवसांत लोखंडांचे दर तब्बल २० टक्क्यांनी गडगडले. या उलाढालीचा फटका देशभरातील लोखंड विक्रेत्यांना बसला आहे. सहा हजार रुपये क्विंटलने विकले जाणारे लोखंड आता चक्क ३,३०० ते ३,६०० रुपयांवर येऊन थांबले आहे.

इमारत बांधकामाच्या इंडस्ट्रीजवर भारतातील आर्थिक नाडी मोठ्या प्रमाणात चालते. इमारत बांधकामासाठी लोखंडी सळईची मागणी कायम असते. देशाची ही भूक रायपूर आणि जालना स्टील इंडस्ट्रीज भागवित असते. देश आणि विदेशातील स्क्रप खरेदी करून ते वितळवून वेगवेगळ्या प्रकारच्या लोखंडाची निर्मिती केली जाते. लोखंडाचे भाव मुळात बाजारपेठेतील स्क्रॅपवर आणि मागणीवर अवलंबून असते. गत काही महिन्यांपासून बांधकाम व्यवसायात आलेल्या मंदीमुळे लोखंडाला मागणी नाही. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून भारतात स्वस्त आणि विपुल स्कॅ्रप दाखल झाले. एकीकडे देशांंतर्गत स्कॅ्रपचे दर २,५०० रुपये क्विंटल असताना, विदेशातील स्क्रॅप केवळ १,५०० रुपये क्विंटल स्वस्त दरात मिळत आहे. त्यामुळे देशातील स्टील इंडस्ट्रीज गडगडली आहे.
 

Web Title: Iron prices fell by 20 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.