- संजय खांडेकर
अकोला: आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्वस्त स्क्रॅप (भंगार) भारतात मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याने, गत आठ दिवसांत लोखंडांचे दर तब्बल २० टक्क्यांनी गडगडले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत झालेल्या उलाढालीचा फटका देशभरातील लोखंड विक्रेत्यांना बसला आहे. सहा हजार रुपये क्विंटलच्या भावाने विक्री होणारे लोखंड आता चक्क ३,३०० ते ३,६०० रुपयांवर येऊन थांबले आहे. त्यामुळे नफा मिळविणे तर दूर, विकत घेतलेल्या भावापेक्षाही स्वस्त दरात व्यापाऱ्यांना लोखंड विक्री करावे लागत आहे.इमारत बांधकामाच्या इंडस्ट्रीजवर भारतातील आर्थिक नाडी मोठ्या प्रमाणात चालते. इमारत बांधकामासाठी लोखंडी सळईची मागणी कायम असते. देशाची ही भूक रायपूर आणि जालना स्टील इंडस्ट्रीज भागवित असते. देश आणि विदेशातील स्क्रॅप खरेदी करून ते वितळवून वेगवेगळ््या प्रकारच्या लोखंडाची निर्मिती केली जाते. लोखंडाचे भाव मुळात बाजारपेठेतील स्क्रॅपवर आणि मागणीवर अवलंबून असते. गत काही महिन्यांपासून बांधकाम व्यावसायात आलेल्या मंदीमुळे लोखंडाला मागणी नाही. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून भारतात स्वस्त आणि विपुल स्क्रॅप दाखल झाले. एकीकडे देशांंतर्गत स्क्रॅपचे दर २,५०० रुपये क्विंटल असताना विदेशातील स्क्रप केवळ १५०० रुपये क्विंटल स्वस्त दरात मिळत आहे. त्यामुळे देशातील स्टील इंडस्ट्रीज गडगडली आहे. ज्या व्यापाऱ्यांनी महागड्या दरात लोखंड विकत घेतले, त्यांना आता तोट्याच्या दरात साठा विकण्याची वेळ आली आहे.चीन, जपान आणि दुबई येथील स्क्रॅप (भंगार) आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून भारतात स्वस्त दरात दाखल झाला आहे. भारतात २,५०० रुपये क्विंटल असलेला स्क्रप आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत केवळ १,५०० रुपये प्रति क्विंटलच्या दरात उपलब्ध होत आहे. त्यामुळे देशातील स्टील इंडस्ट्रीजवर मोठा परिणाम दिसून येत आहे.घर बांधकामासाठी सुवर्णसंधीलोखंडाचे भाव वीस टक्क्यांनी घसरल्याने घर बांधकामासाठी ही योग वेळ असल्याचे जाणकारांचे मत आहे. एकीकडे लोखंड स्वस्त झाले असले तरी वीटा आणि रेतीचे भाव मात्र वधारलेले आहे. त्यामुळे लोखंडात जरी बचत होत असली तरी दुसºया मार्गे ही रक्कम जात आहे.
-आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील उलाढालीचा फटका देशभरातील व्यापाºयांना बसत आहे. अशीच स्थिती कायम राहिली तर भारतातील स्टील इंडस्ट्रीज धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही.- हुसेन मामा, स्टील उद्योजक, अकोला.