मुंबई : लोखंडावर प्रक्रिया करणाऱ्या ‘फॉन्ड्री’ उद्योगात २०२० पर्यंत ३ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होऊन २५ लाखांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मित होईल, अशी अपेक्षा आंतरराष्ट्रीय धातू परिषदेत व्यक्त करण्यात आली. येथील बॉम्बे एक्झिबीशन सेंटरमध्ये दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय धातू परिषद झाली. त्यातील चर्चांमध्ये फॉन्ड्री उद्योगाचा प्रामुख्याने उल्लेख होता.
‘फॉन्ड्री’ उद्योग हे प्रामुख्याने लघु व मध्यम आहेत.
पायाभूत सुविधा क्षेत्राकडून लोखंडी वस्तुंची मागणी वाढली आहे. त्यामुळे फॉन्ड्री व कास्टिंग उद्योगातील उत्पादनांची निर्यात ७ टक्के वाढत आहे. यामुळे फॉन्ड्री उद्योगातील भारताचा वाटा ३ वरुन ६ टक्क्यांवर जाईल, असा विश्वास केंद्र सरकारच्या हिंदुस्थान इंजिनीअरिंग कॉर्पोरेशनचे अध्यक्ष अवजित घोष यांनी व्यक्त केला.
उत्पन्न दुप्पट होणार
केंद्र सरकारने पायाभूत सुविधांवर लक्ष्य केंद्रित केले आहे. रेल्वेचे जाळे विस्तारले जात आहे. रस्त्यांची कामे जोमाने सुरू आहेत. एचएएल, बीडीएलसारख्या संरक्षण उत्पादन कंपन्यांचा विस्तार होत आहे. यातूनच फॉन्ड्री उत्पादन पुढील तीन ते चार वर्षात ११ पट वाढणार आहे. सध्या वार्षिक १ कोटी टन असलेले या क्षेत्रातील उत्पादन ११ कोटी टनापर्यंत जाईल. पुढील आर्थिक वर्षातच हे उत्पादन दुप्पट होईल.’
- डॉ. एच. सुनद्रा मूर्ती, अध्यक्ष, भारतीय फॉन्ड्री संघटना
लोखंडावरील प्रक्रिया उद्योगात २५ लाख रोजगार, आंतरराष्ट्रीय धातू परिषदेतील सूर
लोखंडावर प्रक्रिया करणाऱ्या ‘फॉन्ड्री’ उद्योगात २०२० पर्यंत ३ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होऊन २५ लाखांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मित होईल, अशी अपेक्षा आंतरराष्ट्रीय धातू परिषदेत व्यक्त करण्यात आली.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 12:13 AM2018-03-20T00:13:40+5:302018-03-20T00:13:40+5:30