केंद्रीय कर प्राधिकरणानं (CBIC) गंगाजलावर जीएसटी लागू केल्याचा आरोप फेटाळला आहे. विरोधकांनी सरकारवर गंगेजलावर टॅक्स घेत असल्याचा आरोप केला होता आणि यासंदर्भात सोशल मीडियावर चर्चा सुरू होती. सीबीआयसीनं यावर आता स्पष्टीकरण दिलं आहे. २०१७ मध्ये जीएसटीच्या बैठकीत पूजा साहित्य कराच्या कक्षेतून बाहेर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि गंगाजल पूजा सामग्रीमध्ये येते, असं सीबीआयसीनं म्हटलंय. गेल्या आठवड्यात जीएसटीच्या बैठकीनंतर या विषयावर वाद निर्माण झाला होता.
७ ऑक्टोबर रोजी जीएसटी कौन्सिलची बैठक पारपडली होती. यामध्ये मिलेट्सपासून तयार होणाऱ्या उत्पादनावरील आणि गुळावरील जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतला होता. इतर अनेक वस्तू आणि सेवांवरील टॅक्सच्या दरांमध्ये बदल आणि स्पष्टता देण्यात आली. जीएसटी कौन्सिलच्या बैठकीनंतर सरकारवर गंगाजलावर १८ टक्के जीएसटी लावल्याचा आरोप केला जात होता.
गंगजलावरून होणाऱ्या आरोपांबाबत सीबीआयसीनं स्पष्टीकरण दिलंय. तसंच या आरोपांचं खंडन केलं. टॅक्स अथॉरीटी सीबीआयसीनं गंगाजलावर कोणताही जीएसटी आकारला नसल्याचं म्हटलंय. याबाबत सीबीआयसीनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे.
गंगाजलावर खरंच GST लावलाय का? सरकारनं दिलं स्पष्टीकरण, वाचा
विरोधकांनी सरकारवर गंगेजलावर टॅक्स घेत असल्याचा आरोप केला होता आणि यासंदर्भात सोशल मीडियावर चर्चा सुरू होती.
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 16:01 IST2023-10-13T16:00:37+5:302023-10-13T16:01:10+5:30
विरोधकांनी सरकारवर गंगेजलावर टॅक्स घेत असल्याचा आरोप केला होता आणि यासंदर्भात सोशल मीडियावर चर्चा सुरू होती.
