Join us

सोन्यावर कर्ज घेणे परवडते का?; गोल्ड लोनचे फायदे की तोटे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2024 11:22 AM

सोन्यावर किती कर्ज मिळते?

चंद्रकांत दडस, उपसंपादक

तातडीच्या आर्थिक संकटातून बाहेर निघण्यासाठी सोने तारण ठेवून कर्ज घेणे हा एक महत्त्वाचा आणि सुरक्षित पर्याय आहे. तुमच्याकडे बऱ्यापैकी सोने असेल तर तुम्ही कोणत्याही कटकटीशिवाय यामध्ये एकरकमी कर्जाची रक्कम मिळवू शकतात. गोल्ड लोनचे आणखी काय फायदे आहेत ते जाणून घेऊया...

सोन्यावर किती कर्ज मिळते?यात पर्सनल लोनच्या तुलनेत कमी व्याज असते. जेव्हा सोन्याची किंमत १८ कॅरेट किंवा त्याहून अधिक असेल तेव्हाच तुम्ही गोल्ड लोनसाठी अर्ज करू शकता. बँका आणि वित्तीय संस्था त्यानुसार किमान आणि कमाल रक्कम ठरवतात. आरबीआयने सोन्याच्या कर्जाची मर्यादा ७५ टक्के निश्चित केली आहे.काय कागदपत्रे लागतील?

गोल्ड लोनसाठी सर्वप्रथम अर्ज करावा लागेल. अर्जासोबत तुमचे दोन फोटो जोडा. ओळख प्रमाणपत्रामध्ये आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदार ओळखपत्र जोडा. घरच्या पत्त्यासाठी मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स जोडता येईल. तुम्ही सर्व आवश्यक कागदपत्रे दिल्यानंतरच कर्जासाठी अर्ज करू शकता. यात सर्वांत महत्त्वाचे म्हणजे उत्पन्नाचा पुरावा आणि क्रेडिट स्कोअरची आवश्यकता लागता नाही.सोन्याला सुरक्षा मिळते का?

तुमचे सोने सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी बँकांची असल्याने ग्राहक म्हणून आपण त्याची काळजी करण्याची गरज नाही.शुल्क किती?सोन्याचे कर्ज देणाऱ्या विविध बँकांमध्ये कर्जाचे व्याजदर आणि प्रक्रिया शुल्क वेगवेगळे असते. यात जीएसटी देखील आकारला जातो. ग्राहकाला गोल्ड अप्रेसर शुल्कदेखील भरावे लागते. असे असले तरी पर्सनल कर्जाच्या तुलनेत याचा व्याजदर कमी आहे.

 

टॅग्स :सोनंभारतबँक