Lokmat Money > बिझनेस न्यूज > हा शेअर आहे, की नोटा छापयचं मशीन? 3 वर्षांत 1 लाखाचे केले 11.08 लाख! गुंतवणूकदार मालामाल

हा शेअर आहे, की नोटा छापयचं मशीन? 3 वर्षांत 1 लाखाचे केले 11.08 लाख! गुंतवणूकदार मालामाल

महत्वाचे म्हणजे गेल्या तीन वर्षांपूर्वी हा शेअर केवळ 20 रुपयांवर होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 11:06 PM2023-09-25T23:06:26+5:302023-09-25T23:12:53+5:30

महत्वाचे म्हणजे गेल्या तीन वर्षांपूर्वी हा शेअर केवळ 20 रुपयांवर होता.

Is lokesh machines stock a share or a machine for printing notes 1 lakh made 11.08 lakh in 3 years | हा शेअर आहे, की नोटा छापयचं मशीन? 3 वर्षांत 1 लाखाचे केले 11.08 लाख! गुंतवणूकदार मालामाल

हा शेअर आहे, की नोटा छापयचं मशीन? 3 वर्षांत 1 लाखाचे केले 11.08 लाख! गुंतवणूकदार मालामाल

 शेअर बाजारात असे अनेक शेअर असतात जे आपल्या गुतंवणूकदारांना थोड्याच कालावधीतच छप्परफाड परतावा देऊन मालामाल बनवतात. असाच एक शेअर आहे लोकेश मशीन्स लिमिटेडचा. ही कंपनी मशीन टूल्स आणि ऑटो कंपोनंट्स तयार करते. या कंपनीत ज्या-ज्या लोकांनी पैसा गुतवला ते आता मालामाल झाले आहेत. हा शेअर आज सोमवारी व्यवहाराच्या सत्रात 15.17 टक्क्यांनी वधारत 223.90 रुपयांवर पोहोचला. हा शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक आहे. महत्वाचे म्हणजे गेल्या तीन वर्षांपूर्वी हा शेअर केवळ 20 रुपयांवर होता. 

एक लाखाचे केले 11.08 लाख -
लोकेश मशिन्सचा शेअर 24 सप्टेंबर 2020 रोजी 20.2 रुपयांवर बंद झाला होता. तो 25 सप्टेंबर 2023 रोजी 223.90 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला. अशा पद्धतीने, या शेअरने गेल्या 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 1000 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने गेल्या 3 वर्षांपूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आज त्याचे 11.08 लाख रुपये झाले असते.

कशी आहे कंपनीची आर्थिक स्थिती - 
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीने 50.7 कोटी रुपयांचा महसूल नोंदवला होता. वर्षभरापूर्वी याच कालावधीत तो 50.3 कोटी रुपये एवढा होता. कंपनीच्या नफ्यासंदर्भात बोलायचे झाल्यास, तो 0.8 कोटी रुपये एवढा राहिला आहे. तसेच, एक वर्षापूर्वी याच कालावधीत तो 0.7 कोटी रुपये एवढा होते. जून 2023 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीचा ऑपरेटिंग नफा राहीसा घसरून 5.7 कोटी रुपयांवर आला आहे. तर वर्षभरापूर्वी याच कालावधीत तो 5.8 कोटी रुपये एवढा होता.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

Web Title: Is lokesh machines stock a share or a machine for printing notes 1 lakh made 11.08 lakh in 3 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.