गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल झाला आहे. या मेसेजमध्ये मोदी सरकार प्रत्येक तरुणाला प्रत्येक महिन्याला 34,000 रुपये देणार आहे, असा मेसेज तुम्ही पाहिला असेल. यात पुढे नोंदणीच्या नावाने या मेसेजच्या लिंकवर क्लिक करून तुमची माहिती दिली जाते. या मेसेजला तुम्ही लगेच क्लिक करु नका. हा दावा पूर्णपणे खोटा असून सर्वसामान्यांच्या कष्टाच्या पैशावर डोळा ठेवून गुन्हेगार सोशल मीडियाच्या माध्यमातून असे संदेश पसरवत आहेत. याबाबत सरकारने लोकांना इशाराही दिला आहे.
प्रधानमंत्री ज्ञानवीर योजनेंतर्गत नोंदणी करणाऱ्या सर्व तरुणांना 3400 रुपयांचा दिला जाणारा दावा पूर्णपणे खोटा आहे. अशा कोणत्याही मेसेजला उत्तर देऊ नका, अस सांगण्यात आले आहे. असे मेसेज फॉरवर्ड करण्यापूर्वी, त्याची सत्यता तपासा. सध्या या पद्धतीचे अनेक मेसेज व्हायरल झाले आहेत. सर्व तरुणांना दरमहा 3400 रुपये मिळतील. प्रधानमंत्री ज्ञानवीर योजनेसाठी नोंदणी केली जात आहे, या योजनेअंतर्गत सर्व तरुणांना 3400 रुपये मिळणार आहेत. यासोबतच नोंदणीची लिंकही शेअर केली जात आहे.
सरकार अनेक प्रकारच्या सरकारी योजना राबवते आणि त्यांना प्रोत्साहन देते. अशा सर्व योजनांची माहिती संबंधित विभाग किंवा मंत्रालयाच्या संकेतस्थळावर स्पष्टपणे दिली जाते. सरकार स्वत:ही लोकांना सल्ला देते की, कोणत्याही योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर त्यांनी संबंधित विभागात जाऊन माहिती घ्यावी.
दावा: प्रधानमंत्री ज्ञानवीर योजना के तहत पंजीकरण करने पर सभी युवाओं को प्रति माह ₹3,400 दिए जाएंगे। #PIBFactCheck
— PIB Fact Check (@PIBFactCheck) November 29, 2022
▶️यह दावा फ़र्ज़ी है।
▶️इस तरह की किसी वेबसाइट/लिंक पर अपनी निजी जानकारी साझा न करें।
▶️ऐसे संदेशों को फॉरवर्ड करने से पहले #FactCheck जरूर कर लें। pic.twitter.com/w8RDL4MTMr
कोणत्याही अज्ञात व्यक्ती किंवा अज्ञात स्त्रोताकडून मिळालेल्या माहितीवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. पहिल्यांदा आपल्या स्तरावर त्याची माहिती घ्या. तुम्हाला खात्री असल्यास, फक्त प्रमाणित प्रक्रियेनुसारच अर्ज करा. या मेसेजमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करू नका. तुमची यातून फसवणूक होऊ शकते.