Aadhaar Card Update : आधार कार्ड आता महत्त्वाच्या दस्तऐवजांपैकी एक झालं आहे. अनेक महत्त्वाच्या कामांसाठी आधारची गरज भासते. त्यामुळेच तुमचं आधार कार्ड अपडेटेड असणं आवश्यक आहे. जर आता तुमच्या आधार कार्डाला १० वर्ष पूर्ण झाली असतील आणि अद्यापही ते अपडेट केलं नसेल तर तुम्हाला ते करावं लागणार आहे. मोफत आधार कार्ड अपडेट करण्याची शेवटची तारीख १४ सप्टेंबर आहे. यासाठी आता फक्त आजचा आणि उद्याचा दिवस शिल्लक राहिलाय. त्यामुळे ओळख आणि पत्त्याचा पुरावा ताबडतोब ऑनलाइन सबमिट करून आपली माहिती लवकरात लवकर अपडेट करा.
जर तुम्ही अद्याप तुमच्या आधार कार्डची माहिती मोफत अपडेट केली नसेल तर तुमच्याकडे फक्त २ दिवस शिल्लक आहेत. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियानं (यूआयडीएआय) १४ सप्टेंबर २०२४ पर्यंत आधार कार्डची माहिती मोफत अपडेट करण्याची सुविधा दिली आहे. यानंतर माहिती अपडेट करण्यासाठी शुल्क भरावं लागणार आहे.
आधार कार्ड अपडेट का करावं?
आधार कार्ड हा आपल्या बायोमेट्रिक आणि डेमोग्राफिक माहितीवर आधारित १२ अंकी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतो. जर तुमचं आधार कार्ड १० वर्षांपूर्वी जारी करण्यात आलं असेल आणि अद्याप अपडेट केलं गेलं नसेल तर तुम्हाला तुमची ओळख आणि पत्त्याचा पुरावा नव्यानं सादर करण्याचा सल्ला दिला जातो. माहिती सुरक्षित आणि अचूक ठेवण्यासाठी हे आवश्यक आहे.
आधार ऑनलाइन अपडेट कसं करावं?
- यासाठी सर्वप्रथम यूआयडीएआयच्या www.uidai.gov.in अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- My Aadhaar वर क्लिक करा आणि Update Your Aadhaar निवडा.
- Update Aadhaar Details (Online) वर जाऊन Document Update वर क्लिक करा.
- आपला यूआयडी नंबर, कॅप्चा कोड एन्टर करा आणि Send OTP वर क्लिक करा.
- ओटीपी टाकल्यानंतर लॉगिन करा.
- जी माहिती अपेडट करायची आहे, ती निवडा आणि योग्य माहिती एन्टर करा.
- आवश्यक कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा आणि Submit वर क्लिक करा.
- तुम्हाला अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) मिळेल ज्यातून तुम्ही अपडेटची स्थिती ट्रॅक करू शकता.
- ऑनलाइन प्रक्रियेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, परंतु बायोमेट्रिक माहिती (उदा. आयरिस, बोटांचे ठसे) ऑनलाइन अपडेट करता येणार नाहीत.
आधार ऑफलाइन कसं अपडेट करावं?
- यूआयडीएआयच्या वेबसाइटवरून आधार नोंदणी फॉर्म डाऊनलोड करा.
- फॉर्म भरा आणि आवश्यक कागदपत्रांसह जवळच्या आधार नोंदणी केंद्रावर जमा करा.
- तिथे तुमची बायोमेट्रिक माहिती घेतली जाईल आणि तुम्हाला यूआरएन दिला जाईल.