Join us

Video : तुमचा iPhone 15 खरा आहे की बनावट? बॉक्समध्ये फीचर तुम्हाला देईल माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2023 3:01 PM

जेव्हा तुम्ही iPhone सारखा महागडा प्रोडक्ट विकत घेत असाल तर नक्कीच काळजी घ्यायला हवी.

Fake iPhone 15:  स्कॅम आणि बनावट उत्पादनांच्या या युगात, तुम्हाला या सर्वांच्या एक पाऊल पुढे राहावं लागेल. विशेषत: जेव्हा तुम्ही iPhone सारखा महागडा प्रोडक्ट विकत घेत असाल तर नक्कीच काळजी घ्यायला हवी. iPhone 15 ची विक्री सुरू झाली आहे आणि स्कॅम करणारे देखील पुन्हा एकदा अॅक्टिव्ह झाले आहेत. असं अनेकवेळा दिसून आलंय की काही लोक बनावट फोन खरा असल्याचं भासवून त्यांची विक्री करतात. अशा परिस्थितीत स्कॅम करणाऱ्यांपेक्षा एक पाऊल पुढे राहण्याची गरज आहे.

नवीन iPhone 15 विकत घेण्यापूर्वीच तो फोन खरा आहे की खोटा हे तुम्ही कसं तपासू शकता हे आपण जाणून घेऊ. Apple ने बनावट आयफोनचा मुद्दाच आता संपवला आहे. याचं कारण म्हणजे कंपनीनं रिटेल बॉक्समध्येच एक हाय सिक्युरिटी सिस्टम दिली आहे. ती पाहून तुम्हाला समजेल की तुम्ही खरेदी करत असलेला फोन खरा आहे की बनावट.

रिटेल बॉक्समध्ये लपलंय फीचरतुम्हाला कदाचित याची माहिती नसेल, पण यावेळी अॅपलने रिटेल बॉक्समध्येच एक सिक्युरिटी फीचर दिलं आहे. हे तुम्ही फोन खरेदी करण्यापूर्वी तपासलं पाहिजे. नुकताच एका पोस्टच्या माध्यमातून यासंदर्भातील एक व्हिडिओ समोर आला आहे.

आणखीही आहेत काही पद्धतीतुमचा आयफोन बनावट असल्याचा तुम्हाला संशय असल्यास बॉक्सवर दिलेला सीरिअल नंबर किंवा आयएमईआय नंबर फोनच्या सेटिंग्समध्ये जाऊन तपासून पाहू शकता. फोनच्या मागच्या बाजूला दिलेली माहिती तुम्ही पाहू शकता. याशिवाय, सिम ट्रेवर IMEI नंबर देखील लिहिलेला असतो, फोन खरोखर खरा आहे की नाही हे देखील तुम्ही या पद्धतींद्वारे शोधू शकता.

फोन घेताना फोनमधील अॅपल आयडी लॉग इन करा, जर हा फोन क्लोन असेल तर अॅपल आयडी लॉग इन होणार नाही. या सर्व समस्या लक्षात घेऊन iPhone 15 सीरीजच्या रिटेल बॉक्सवर होलोग्राम लपवून ठेवण्यात आलाय.

टॅग्स :अॅपलव्यवसाय