Join us  

How to check if your ₹500 is fake or real? तुमच्या खिशातील ५०० रुपयांची नोट खोटी तर नाही ना? RBI च्या ११ टिप्सने खऱ्या-खोट्याचा फरक ओळखा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2022 3:07 PM

How to check if your ₹500 is fake or real? - गेल्या अनेक वर्षांपासून देशात बनावट नोटा सर्रास मिळण्याच्या घटना समोर येत आहेत.

How to check if your ₹500 is fake or real? - गेल्या अनेक वर्षांपासून देशात बनावट नोटा सर्रास मिळण्याच्या घटना समोर येत आहेत. आपल्यापैकी अनेकांकडे कधी ना कधी बनावट नोट आली असेलच. आपल्या खिशातील ५०० रुपयांची नोट खरी की खोटी हेही माहित नसते. बनावट नोटा या अगदी खऱ्या नोटांसारख्या दिसतात, त्यामुळे आपण खऱ्या-खोट्याचा फरक सहज ओळखू शकत नाही.

जर तुम्हालाही खोट्या आणि खऱ्या नोटांमध्ये फरक करण्यात अडचण येत असेल, तर तुम्हाला आता काळजी करण्याची गरज नाही. रिझर्व्ह बँकेने स्वतः एक चेकलिस्ट जारी केली आहे, ज्याचे पालन करून तुम्ही ५०० रुपयांची बनावट नोट ओळखू शकता.  

५०० रुपयांची खरी- खोटी नोट या पद्धतींनी ओळखा -१. जर तुम्ही ५०० रुपयांची नोट दिव्यासमोर ठेवली तर तुम्हाला ठराविक ठिकाणी ५०० असे लिहिलेले दिसेल.२. तुम्ही नोट डोळ्यासमोर ४५ डिग्रीच्या कोनात ठेवली तरी तुम्हाला या विशिष्ट ठिकाणी ५०० असे लिहिलेले दिसेल. तसेच या ठिकाणी देवनागरीत ५०० लिहिलेले दिसेल.३. नोटेच्या उजव्या बाजूला मध्यभागी महात्मा गांधींचे चित्र आहे आणि नोटमध्ये भारत लिहिलेले दिसेल.४. जर तुम्ही नोट थोडीशी फिरवली, तर तुम्हाला सुरक्षा धाग्याचा रंग हिरव्या ते इंडिगोमध्ये बदलताना दिसेल. ५. गव्हर्नरची स्वाक्षरी, गॅरंटी क्लॉज, प्रॉमिस क्लॉज आणि आरबीआयचा लोगो उजव्या बाजूला हलवण्यात आले आहेत

६. महात्मा गांधींचा फोटो आणि इलेक्ट्रोटाइप वॉटरमार्क देखील दृश्यमान आहे.७. वरच्या डाव्या आणि खालच्या उजव्या बाजूच्या संख्या डावीकडून उजवीकडे वाढतात.८  नोटेवर लिहिलेल्या ५०० क्रमांकाचा रंग हिरव्या ते निळ्यामध्ये बदलतो. नोटेच्या उजव्या बाजूला अशोक स्तंभ आहे.९. उजव्या बाजूला सर्कल बॉक्समध्ये ५०० लिहिले आहे. उजव्या आणि डाव्या बाजूला ५ ब्लीड रेषा आहेत आणि अशोक स्तंभाचे प्रतीक आणि महात्मा गांधींचे चित्र रफल प्रिंटमध्ये आहे.१०. नोटमध्ये तुम्ही तिच्या छपाईचे वर्ष पाहू शकता. घोषणेसोबत स्वच्छ भारताचा लोगो छापण्यात आला आहे.११. भाषा पॅनेल मध्यभागी स्थित आहे.. भारतीय ध्वजासह लाल किल्ल्याचे चित्र छापलेले आहे.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :व्यवसायभारतीय रिझर्व्ह बँक