रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जियो फायनॅन्शिअल सर्व्हिसेसच्या (JFSL) संचालकपदासाठी ईशा अंबानीच्या नावाला मंजुरी दिली आहे. याच बरोबर, जेएफएसएलचे (JFSL) डायरेक्टर म्हणून अंशुमन ठाकूर आणि हितेश कुमार सेठिया यांच्या नावालाही आरबीआयने मान्यता दिली आहे. महत्वाचे म्हणजे, 15 नोव्हेंबरला या नियुक्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. ही मान्यता सहा महिन्यांसाठी वैध असणार आहे. याशिवाय, रिलायन्स रिटेलची धुराही ईशा अंबानीकडेच आहे.
52.45 कोटी रुपये कंपनीचा टर्नओव्हर -
आरबीआयने एका पत्रात म्हटल्यानुसार, कंपनी सहा महिन्यांच्या निर्धारित मुदतीत या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्यात अयशस्वी ठरली, तर तिला कारण देण्याबरोबरच पुन्हा अर्ज करावा लागेल. कंपनीचा टर्नओव्हर 52.45 कोटी रुपये, तर मार्केट-कॅप 1,44,219.55 कोटी रुपये एवढा राहिला आहे. काही दिवसांपूर्वीच, रिलायन्स इंडस्ट्रीजने डी-मर्जरच्या माध्यमाने आपला फायनॅन्शिअल बिझनेस वेगळा करण्यात आला. शेअर बाजारात या कंपनीची लिस्टिंग ऑगस्टमध्ये झाली होती.
227 रुपयांवर पोहोचलाय शेअर -
जियो फायनॅन्शिअलचा शेअर गुरुवारी बंद झालेल्या व्यवहाराच्या सत्रात 2.75 अंकांच्या तेजीसह 227 रुपयांवर बद झाला. या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 278.20 रुपये तर नीचाक 204.65 रुपये एवढा आहे. महत्वाचे म्हणजे तज्ज्ञांकडून या शेअरमध्ये लॉन्ग टर्म गुंतवणुकीचा सल्ला दिला जात आहे.
महत्वाचे म्हणजे, गेल्या 7 जुलैला झालेल्या बैठकीत कंपनी बोर्डाकडून ईशा अंबानी आणि अंशुमन ठाकुर यांना नॉन एक्झिक्यूटिव्ह डायरेक्टर म्हणून नियुक्त करण्यासंदर्भात शिफारस करण्यात आली होती.