Isha Ambani : दिग्गज भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी लवकरच 6 जागतिक फॅशन ब्रँड भारतात आणणार आहे. सध्या ईशा अंबानी रिलायन्स रिटेल, या रिलायन्स ग्रुप कंपनीचे नेतृत्व करते. तिने 2022 पासून रिटेल व्यवसायाची जबाबदारी स्वीकारली. त्यानंतर जागतिक ब्रँड भारतात आणण्याचे प्रयत्न वाढवले. 820,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्य असलेल्या रिलायन्स रिटेलने गेल्या वर्षी अनेक मोठ्या ब्रँडसोबत करार केले आहेत.
हे ब्रँड भारतात आणण्याची तयारी सुरू मुकेश अंबानी यांनी आतापर्यंत अनेक जागतिक ब्रँड्स भारतात आणले आहेत. आता त्यांची मुलगी ईशा आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत 6 जागतिक फॅशन ब्रँड भारतात आणण्याच्या तयारीत आहे. व्हर्साचे, अरमानी, बालेनियागा आणि बॉस हे यापैकी काही ब्रँड आहेत. याशिवाय येत्या काही महिन्यांत आणखी सहा जागतिक फॅशन ब्रँड येऊ शकतात. यामध्ये ओल्ड नेव्ही, अरमानी कॅफे, असोस, शीन, ईएल एंड एन कैफे आणि सैंड्रो माजे बाय एसएमसीप ग्रुपचा समावेश आहे.
या ब्रँड्सचे कपडे किंवा इतर उत्पादने खरेदी करण्यासाठी तुम्ही रिलायन्सचे अजिओ ॲप वापरू शकता. तुम्ही त्या संबंधित ब्रँडच्या ॲपवरदेखील जाऊ शकता. याशिवाय तुम्हाला अनेक ब्रँड्स Jio World Plaza येथेही पाहायला मिळतील.