Join us

Fastag : ‘फास्टॅग’ आहे ना?, वाचा नव्या तंत्रज्ञानाची इत्थंभूत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 6:05 AM

Fastag : फास्टॅग नसेल तर दुप्पट टोलआकारणी केली जाणार आहे.

नववर्षाच्या सुरुवातीलाच वाहनधारकांसाठी फास्टॅग अनिवार्य करण्यात आला होता. मात्र, त्यास १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आता यापुढे फास्टॅगला मुदतवाढ देणार नसल्याचे रविवारी ठणकावून सांगितले. फास्टॅग नसेल तर दुप्पट टोलआकारणी केली जाणार आहे. परिणामी दुचाकी वाहनधारक वगळून सर्वच वाहनधारकांना आता त्यांच्या गाडीच्या विण्डस्क्रीनवर फास्टॅगचे स्टिकर लावावे लागणार आहे. काय आहे नेमके हे प्रकरण जाणून घेऊ या...

काय असतो फास्टॅग?फास्टॅग हा एक टॅग किंवा स्टिकर आहे. ते रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन (आरएफआयडी) तंत्रज्ञानावर काम करतेटोलनाक्यावरील कॅमेरा स्टिकरवरचा बारकोड स्कॅन करतो आणि टोल आपोआप फास्टॅगच्या वॉलेटमधून कापला जातोवाहनधारकांना टोलनाक्यावर खोळंबावे लागत नाही. त्यामुळे वेळ आणि इंधन यांची बचत होते. प्रवासही झटपट होतो.

कुठे मिळतो फास्टॅग?- फास्टॅग ऑनलाइन आणि ऑफलाइन खरेदी करता येऊ शकतो- ॲथॉराइज्ड बँकेतून अथवा ई-कॉमर्स व्यासपीठांवरूनही ऑनलाइन मिळू शकतो- देशातील २३ ॲथॉराइज्ड बँका, भूपृष्ठ वाहतूक विभागाचे हजारो विक्री केंद्रे येथेही फास्टॅग तुम्हाला उपलब्ध होऊ शकतो. 

फास्टॅगची किंमत- नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) यांनी फास्टॅगची किंमत १०० रुपये एवढी निश्चित केली आहे. याशिवाय २०० रुपये अनामत रक्कम भरावी लागते- अनेक बँका आपल्याकडे ग्राहक आकर्षित व्हावे यासाठी किरकोळ किमतीचे फास्टॅगही देऊ करतात

फास्टॅग खरेदीसाठी कोणत्या दस्तऐवजांची गरजड्रायव्हिंग लायसन्स वाहननोंदणी प्रमाणपत्रपॅनकार्ड आधार कार्ड

३०,०००  पॉइंट ऑफ सेल भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) फास्टॅग विक्रीसाठी देशभरात उपलब्ध करून दिले आहेत.

थर्ड पार्टी इन्शुरन्स नाहीवाहनचालकांनी फास्टॅग लावला नाही तर त्यांना थर्ड पार्टी इन्शुरन्स दिला जाणार नाही. एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाण्याची शक्यता आहे.

फास्टॅग नसेल तर काय?दुप्पट टोल भरावा लागेल

फास्टॅग वॉलेटमध्ये पुरेसा बॅलन्स नसेल तर काय?- फास्टॅग वॉलेटमध्ये पुरेशी रक्कम शिल्लक नसेल तरी टोलनाका पार करता येऊ शकतो.- ही सुविधा फक्त कार, जीप, व्हॅन यांसारख्या प्रवासी वाहनांसाठीच आहे. व्यावसायिक वाहनांना नाही.- त्यांच्याकडे पुरेसा बॅलन्स नसताना टोल नाका पार केला तर अनामत रकमेतून कर कापला जाईल.- पुढील रिचार्जवेळी त्याची भरपाई करावी लागेल.

(संकलन : विनय उपासनी   ग्राफिक : नागेश बैताडिया)

टॅग्स :फास्टॅगनितीन गडकरी