मुंबई : युद्धामुळे मध्यपूर्वेतील इंधन उत्पादनात अडथळे येण्याची चिंता व्यक्त होत असून, यामुळे कच्च्या तेलाच्या दरात २.२५ डॉलर प्रति बॅरलने वाढ होत ते ८६.८३ डॉलरपर्यंत वाढ झाली आहे. इस्रायल आणि पॅलेस्टिनी प्रदेश हे तेल उत्पादक नाहीत, मात्र मध्यपूर्वेकडील प्रदेशात जगभरात एक तृतीयांश तेलाचा पुरवठा होतो. हमास गटाला इराणकडून थेट पाठिंबा आहे. इराण हा जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादकांपैकी एक आहे. त्याचा परिणाम जगावर होणार आहे.
गुंतवणूकदारांना लागला माेठा चुना -
पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे गुंतवणूकदारांनी सोमवारी वित्तीय आणि ऊर्जा कंपन्यांचे समभाग विकले, ज्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी एक टक्क्याने घसरले.
इस्रायल आणि हमास यांच्यातील संघर्षामुळे अनिश्चिततेची परिस्थिती निर्माण झाली असून त्यामुळे गुंतवणूकदार मोठी जोखीम घेण्याचे टाळत आहेत. यामुळे निफ्टी १४१ अंकांनी तर सेन्सेक्स ४८३ अंकांनी कोसळला.