Lokmat Money > बिझनेस न्यूज > इस्रायल-हमास युद्धाने अब्जावधींची गुंतवणूक धाेक्यात; माेठमाेठ्या कंपन्यांचं टेन्शन वाढलं

इस्रायल-हमास युद्धाने अब्जावधींची गुंतवणूक धाेक्यात; माेठमाेठ्या कंपन्यांचं टेन्शन वाढलं

जगातील स्टार्टअप कंपन्यांचे माेठे हब आले संकटात, महत्त्वाच्या खनिजांची निर्यातही अडचणीत

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 09:34 AM2023-10-13T09:34:34+5:302023-10-13T09:35:14+5:30

जगातील स्टार्टअप कंपन्यांचे माेठे हब आले संकटात, महत्त्वाच्या खनिजांची निर्यातही अडचणीत

Israel-Hamas war threatens billions in investment; The tension of leading companies increased | इस्रायल-हमास युद्धाने अब्जावधींची गुंतवणूक धाेक्यात; माेठमाेठ्या कंपन्यांचं टेन्शन वाढलं

इस्रायल-हमास युद्धाने अब्जावधींची गुंतवणूक धाेक्यात; माेठमाेठ्या कंपन्यांचं टेन्शन वाढलं

वाॅशिंग्टन : इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धामुळे पुन्हा एकदा जगाचे टेन्शन वाढविले आहे. यामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेसमाेर नवा गतिराेधक निर्माण हाेऊ शकताे. इस्रायलला स्टार्टअप कंपन्यांचे हब मानले जाते. अमेरिका आणि भारतासह अनेक देशांमधील बड्या आयटी कंपन्यांनी तेथे प्रचंड गुंतवणूक केली आहे. युद्ध दीर्घकाळ सुरू राहिल्यास या इस्रायलच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम हाेईलच, याचा या कंपन्यांनाही फटका बसू शकतो.

युद्धामुळे इस्रायलने राखीव सैनिकांना कर्तव्यावर बाेलाविले आहे. हे लाेक शिक्षक, टेक वर्कर्स, डाॅक्टर, नर्स, स्टार्टअप उद्याेजक तसेच पर्यटन क्षेत्रात कामाला आहेत. युद्ध लांबल्यास हे मनुष्यबळ नियमित कामावर परतू शकणार नाहीत. त्यामुळे तेथील उत्पादनावर माेठा परिणाम हाेण्याची भीती आहे. 

भारतातील या लिस्टेड कंपन्यांची गुंतवणूक
विप्राे : इस्रायलमधील आयटी कंपनी विप्राे आहे. विमानांचे सुटे भाग बनविणाऱ्या एच. आर. गिवाेन या कंपनीचे विप्राेने २०१६ मध्ये अधिग्रहण केले.

टीसीएस : कंपनीचे इस्रायलमध्ये सुमारे १,१०० कर्मचारी आहेत. वर्ष २००५ पासून कंपनीने तेथे काम सुरू केले आहे. 

इन्फाेसिस : इन्फाेसिसचीही इस्रायलमध्ये माेठ्या प्रमाणावर गुंतवणूक आहे. औद्याेगिक संशाेधनाच्या क्षेत्रात कंपनीचे काम आहे.

एचसीएल टेक : कंपनीची इस्रायलमध्ये दाेन कार्यालये आहेत. कंपनीसाठी ही धाेरणात्मक गुंतवणूक आहे.

या अमेरिकन कंपन्यांची इस्रायलमध्ये गुंतवणूक
अमेरिकेतील अनेक टेक कंपन्यांनी गुंतवणूक केलेली आहे. त्यात मायक्राेसाॅफ्ट, अल्फाबेट (गुगल), ॲपल, ओरॅकल, इंटेल इत्यादींचा समावेश आहे. 

इंटेल इस्रायलमध्ये उत्पादन युनिटमध्ये गुंतवणूक करत आहे. गाझा सीमेपासून ही जागा काही किलाेमीटर अंतरावर आहे.  एश्दाॅद बंदर अवघ्या ३२ किलाेमीटर अंतरावर आहे. हे पाेटॅशियम निर्यातीचे हब आहे.

इस्रायलचा मृत समुद्राचा परिसर खनिजांनी समृद्ध आहे. तेथून माेठ्या प्रमाणावर निर्यात हाेते.१६० अब्ज डाॅलरपेक्षा जास्त इस्रायलची निर्यात गेल्या वर्षी झाली हाेती.
 

Web Title: Israel-Hamas war threatens billions in investment; The tension of leading companies increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.