Join us  

इस्रायल-हमास युद्धामुळे भारतीय टेलिकॉम कंपन्यांना 2,500 कोटींचा फटका, कारण काय...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 9:00 PM

इस्जरायल आणि हमास यांच्यातील युद्ध दीर्घकाळ चालू राहिल्यास, त्याचा परिणाम अनेक देशांवर होऊ शकतो.

नवी दिल्ली :इस्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमास यांच्यातील लढाईमुळे भारताला 2,500 कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते. या संघर्षामुळे, आयात केलेल्या 5G नेटवर्क गियरची किंमत 2,000 ते 2,500 कोटी रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. तसेच, टेलिकॉम कंपन्यांच्या 5G रोलआउट योजनांनाही विलंब होऊ शकतो. 

सध्या देशातील मोजक्याच शहरांमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध दीर्घकाळ सुरू राहिल्यास डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य तीन-चार टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे दूरसंचार कंपन्यांच्या विदेशी कर्जाची परतफेड करण्याचा खर्चही वाढेल आणि येत्या तिमाहीत त्यांच्या नफ्यावर परिणाम होऊ शकतो.

तज्ञांच्या मते, स्थानिक फोन नेटवर्कमध्ये वापरल्या जाणार्‍या टेलिकॉम गियरपैकी सुमारे 67 टक्के परदेशातून आयात केले जाते. एरिक्सन, नोकिया आणि सॅमसंगसारख्या कंपन्या, हा पुरवठा करतात. रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया दरवर्षी सात अब्ज डॉलर्स म्हणजेच 58,000 कोटी रुपयांचे टेलिकॉम गियर आयात करतात. Jio ने अलीकडेच $4 अब्ज किमतीचे नेटवर्क गियर खरेदी करण्यासाठी परदेशातून कर्ज उभारले आहे, तर Airtel 5G रोलआउटवर दरवर्षी सुमारे $3.5 अब्ज खर्च करत आहे. देशांतर्गत नेटवर्कमध्ये वापरल्या जाणार्‍या दोन तृतीयांश गियर अजूनही आयात केले जातात.

टॅग्स :इस्रायल - हमास युद्धइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षभारतइस्रायलव्यवसायगुंतवणूकआंतरराष्ट्रीय