Lokmat Money > बिझनेस न्यूज > कार्पाेरेटस् ना बँक स्थापनेचा परवाना देणे धोकादायक

कार्पाेरेटस् ना बँक स्थापनेचा परवाना देणे धोकादायक

रघुराम राजन, विरल आचार्य यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2020 05:49 AM2020-11-25T05:49:42+5:302020-11-25T05:50:04+5:30

रघुराम राजन, विरल आचार्य यांची टीका

It is dangerous to give a bank establishment license to corporates | कार्पाेरेटस् ना बँक स्थापनेचा परवाना देणे धोकादायक

कार्पाेरेटस् ना बँक स्थापनेचा परवाना देणे धोकादायक

नवी दिल्ली : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अंतर्गत कृतीगटाने कॉर्पोरेट घराण्यांना बँका स्थापन करण्यास परवानगी देण्याची शिफारस नुकतीच केली आहे. यावर आरबीआयचे माजी गर्व्हनर रघुराम राजन आणि डेप्युटी गर्व्हनर विरल आचार्य यांनी कडाडून टीका केली. अशी शिफारस एखाद्या बाॅम्बगाेळ्यांसारखी धोकादायक असून, यासाठी हीच वेळ का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

राजन आणि आचार्य यांनी एकत्रपणे लिहिलेल्या एका लेखात याचा समाचार घेतला आहे. त्यांनी लिहिले आहे की, जगातील इतर देशांप्रमाणे भारताही बँकांना क्वचितच बुडू दिले जाते. येस बँक आणि लक्ष्मी विलास बँकेची ताजी उदाहरणे आपल्यापुढे आहेत. त्यामुळे शेड्यूल्ड बँकेतील पैसा सुरक्षित आहे हे ठेवीदारांनाही माहीत असते. हा पैसा बॅंकांना सहज वापरता येताे. 

Web Title: It is dangerous to give a bank establishment license to corporates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.