- संतोष ठाकूर
नवी दिल्ली - देशात इलेक्ट्रिक कारचा वापर वाढावा यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत असून, त्यात खासगी कंपन्याही साथ देत आहेत. ई वाहनांबाबत सरकारच लवकरच धोरण आणणार आहे. ही वाहने चार्ज करण्याचेही नियम निश्चित केले जातील. त्यात वाहन त्वरित चार्ज करून हवे असल्यास, अधिक पैसे तर स्वस्तात चार्जिंग हवे असल्यास अधिक वेळ द्यावा लागेल.
केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या अधिकाºयाने सांगितले की, वेगाने चार्जिंगमध्ये अर्ध्या तासात वाहन चार्ज होईल. एका चार्जिंगमध्ये वाहन ३०० किलोमीटर धावू शकेल. स्वस्तात वाहन चार्ज करण्यासाठी आठ ते नऊ तास लागतील. हे चार्जिंग लोक घरी करू शकतील वा कार चार्जिंग स्टेशनवर तितका वेळ ठेवावी लागेल.
कारच्या चार्जिंगसाठी इतका वेळ लागणार असेल तर लोक ई वाहने घेतील का, असे विचारले असता अधिकारी म्हणाला की, चार्जिंगसाठी दोन दर असल्याने लोकांना पर्याय असेल. स्वस्तातील चार्जिंग रात्रभर घरीच करता येईल वा त्यासाठी कार रात्रभर स्टेशनवर ठेवण्याचा पर्याय त्यांना आहे. कार पूर्ण चार्ज झाल्यानंतर त्यांना दिवसभर कार वापरता येईल. कार वेगाने चार्जिंग करण्यासाठी अधिक क्षमतेची वीज लागते. ती महाग आहे. कारला चार्ज करणारी ही स्टेशन्स नेमकी कशी चालतात, हे नीति आयोगाच्या कार्यालयात कुणालाही
पाहता येईल. लोकांना माहिती व्हावी, यासाठी दोन्ही प्रकारची चार्जिंग स्टेशन तिथे सरकारने ठेवली आहेत.
युनिव्हर्सल चार्जर
सरकारच्या विजेवरील वाहनांसाठी स्वतंत्र स्टेशन्स असतील. मोबाइलप्रमाणे कारचेही युनिव्हर्सल चार्जर लवकरच उपलब्ध होतील.
विमा हप्ता होणार कमी
दुचाकी व चारचाकी वाहनांच्या ‘थर्ड पार्टी’ विम्याचा हप्ता यंदा कमी होण्याची शक्यता आहे. विमा कंपन्यांकडे दाखल होणारे अपघातग्रस्तांचे भरपाईचे दावे आणि कंपन्यांच्या नफ्या-तोट्याचे गुणोत्तर यांचा आढावा घेऊन प्राधिकरण दरवर्षी ‘थर्ड पार्टी’ विम्याच्या हप्त्याचे कोष्टक ठरवते.
या वर्षासाठी प्रस्तावित कोष्टक चर्चा व विचारासाठी जाहीर केले आहे. त्यानुसार १,००० सीसी इंजिनांच्या खासगी मोटारींचा वार्षिक हप्ता १,८५० रुपये प्रस्तावित आहे. तसेच ७५ सीसीपर्यंतच्या दुचाकी वाहनांचा हप्ता ४२७ रुपये प्रस्तावित आहे.मात्र १,००० ते १,५०० सीसी आणि अधिक क्षमतेच्या मोटारींचा विमा हप्ता कायम ठेवला आहे, तर १५० ते ३५०सीसी क्षमतेच्या दुचाकी वाहनांच्या विमा हप्त्यात जुजबी वाढ करण्याचा विचार आहे.
७,५०० सीसीपर्यंतच्या मालवाहतूक वाहनांचा हप्ताहीकायम ठेवण्याचा विचार असून, रिक्षा टेम्पो व पॅडलने चालविली जाणारी तीन चाकी मोटारवाहने यांच्या हप्त्यांत कपात करण्याचा विचार आहे.
कार वेगाने चार्ज करणे असेल महाग
देशात इलेक्ट्रिक कारचा वापर वाढावा यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत असून, त्यात खासगी कंपन्याही साथ देत आहेत. ई वाहनांबाबत सरकारच लवकरच धोरण आणणार आहे. ही वाहने चार्ज करण्याचेही नियम निश्चित केले जातील.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2018 01:52 AM2018-03-11T01:52:47+5:302018-03-11T01:52:47+5:30