>नवी दिल्ली : चालू आर्थिक वर्षात भारतीय आयटी हार्डवेअर उद्योग 15.54 वरून 16.16 अब्ज डॉलरवर जाईल, असा दावा उद्योग संघटना मॅटने केला आहे. संशोधन संस्था आयएमआरबी इंटरनॅशनलद्वारा मॅटसाठी केलेल्या उद्योगाच्या कामगिरी अभ्यासानुसार, आयटी हार्डवेअर बाजार 2क्13-14 मध्ये अंदाजे 12.43 अब्ज डॉलर एवढा राहिला.
चालू आर्थिक वर्षाच्या परिस्थितीबाबत विचारले असता मॅटचे अध्यक्ष अमर्न बाबू यांनी सांगितले की, आयटी हार्डवेअर उद्योगाच्या वाढीची मोठी शक्यता आहे. यात 25 ते 3क् टक्क्यांनी वाढ होईल. भारतात पर्सनल कॉम्प्युटरचा प्रसार सध्या 9.5 टक्के एवढा आहे. रशियात हेच प्रमाण 57.1, ब्राझीलमध्ये 45.4 आणि चीनमध्ये 35.4 टक्के एवढे आहे. या पाश्र्वभूमीवर भारतात या क्षेत्रत मोठी वाढ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आयएमआरबी इंटरनॅशनल समूहाचे बिझनेस डायरेक्टर विश्वप्रिय भट्टाचार्य यांनी सांगितले की, छोटय़ा आणि मध्यम कंपन्यांच्या पाठबळामुळेही पीसी बाजारात तेजी राहिली.
यंदा पीसीची विक्री तीन टक्क्यांनी वाढून 1.221 कोटींर्पयत पोहोचण्याची शक्यता आहे. जागतिक मंदीमुळे गेल्या काही वर्षात संगणक क्षेत्र ओहोटीला लागले आहे. विक्री कमी झाल्यामुळे कंपन्या अडचणीत होत्या. या परिस्थितीत सुधारणा होत आहे. तथापि, सुधारणोचा वेग कमी आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
4या अभ्यासानुसार भारतात गेल्या आर्थिक वर्षात एकुण 1.185 कोटी रुपये एवढा राहिला. यात डेस्कटॉप आणि नोटबुक दोन्ही प्रकारच्या उपकरणांचा समावेश आहे. या काळात डेस्कटॉपची विक्री 26 टक्क्यांनी कमी होऊन 5क्.1 युनिट एवढी राहिली, तर नोटबुक आणि नेटबुक यांच्या विक्रीत 55 टक्क्यांनी वाढ नोंदली गेली. यामुळे या काळात 68.4 लाख युनिटची विक्री झाली.