Lokmat Money > बिझनेस न्यूज > नव्या नोटांची नक्कल करणे अशक्य

नव्या नोटांची नक्कल करणे अशक्य

२,००० आणि ५०० रुपयांच्या नव्या भारतीय नोटांची नक्कल करणे पाकिस्तानला शक्य होणार नसल्याची ग्वाही गुप्तचर संघटनांनी दिली.

By admin | Published: November 11, 2016 04:28 AM2016-11-11T04:28:05+5:302016-11-11T04:28:05+5:30

२,००० आणि ५०० रुपयांच्या नव्या भारतीय नोटांची नक्कल करणे पाकिस्तानला शक्य होणार नसल्याची ग्वाही गुप्तचर संघटनांनी दिली.

It is impossible to copy new notes | नव्या नोटांची नक्कल करणे अशक्य

नव्या नोटांची नक्कल करणे अशक्य

नवी दिल्ली : २,००० आणि ५०० रुपयांच्या नव्या भारतीय नोटांची नक्कल करणे पाकिस्तानला शक्य होणार नसल्याची ग्वाही गुप्तचर संघटनांनी दिली. या नोटांवरील सुरक्षा मानकांमुळे त्यांची नक्कल करणे जवळजवळ अशक्य असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. या नोटांवरील सुरक्षा मानकांची संख्या सांगण्यास या अधिकाऱ्याने नकार दिला. गेल्या सहा महिन्यांपासून गोपनीयरीत्या छपाई होत असलेल्या या नोटांवरील सुरक्षा मानकांची रिसर्च अ‍ॅनॅलिसिस विंग (रॉ), इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) आणि डीआरआय आदी गुप्तचर संघटनांनी तपासणी केली.
पाकिस्तानच्या पेशावरमध्ये बनावट भारतीय नोटा छापणारी टाकसाळ असून, तेथे बहुतांश करून ५०० आणि १ हजार रुपयांच्या भारतीय नोटा छापल्या जातात, अशी माहिती गुप्तचर संघटनांनी भारत सरकारला दिली होती. पाकची गुप्तचर संघटना आयएसआय ही टाकसाळ चालविते. या नोटा भारतात चलनात आणण्यासाठी आयएसआय दाऊद इब्राहिम आणि लष्कर-ए-तोयबाशिवाय इतर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी जाळ्यांचाही वापर करते. पाक यंत्रणेने हुबेहूब भारतीय नोटा छापण्याचे कौशल्य प्राप्त केल्याचे गुप्तचर संघटनांनी सरकारला कळविले होते. एका अंदाजानुसार, पाकिस्तान दरवर्षी ७० कोटी रुपये मूल्याच्या बनावट भारतीय नोटा भारतीय अर्थव्यवस्थेत घुसवतो. यातून मिळालेले पैसे दहशतवादी कारवाया तसेच काश्मिरात अस्थैर्य निर्माण करण्यासाठी वापरले जातात. भारताने ५०० आणि १,००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्यामुळे पाकिस्तानातील बनावट भारतीय नोटांची टाकसाळ बंद पडेल, असे केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: It is impossible to copy new notes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.