नवी दिल्ली- देशातील मोठ्या चलनात बदल झाल्यानंतर आता नव्या रुपात 10 रुपयांच्या नोट बाजारात येणार आहे. या नव्या नोटेवर इंग्रजी आणि देवनागरी लिपीत 10 लिहिलेलं असून, नोटेच्या मध्यभागी महात्मा गांधींचं चित्र पाहायला मिळेल. नोटेवर 'RBI', ‘भारत', ‘INDIA' आणि '10' सूक्ष्म अक्षरात लिहिलेलं दिसेल. या नोटेच्या उजव्या बाजूला अशोकस्तंभाचं चित्र असून, डाव्या बाजूला प्रिंटिंगचं वर्षं छापलेलं असणार आहे. या नोटा चॉकलेट ब्राऊन कलरच्या असतील आणि या नोटांवर कोणार्क सूर्य मंदिराचा फोटो छापण्यात येणार आहे. तसेच या नोटांवर छपाईचं वर्षं 2017 लिहिलं असेल. नोटांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांची स्वाक्षरी असेल.
रिझर्व्ह बँक लवकरच 100, 20 व 10 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आणणार असून, त्यांच्या छपाईचे कामही वेगाने सुरू आहे. या नव्या नोटा चलनात आल्या तरी त्या मूल्याच्या जुन्या नोटा रद्द करण्याचा केंद्र सरकारचा तूर्त विचार नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नव्या नोटांच्या डिझाइनमध्ये थोडे बदल करण्यात आलेले असून, त्यांचा रंग जुन्या नोटांपेक्षा वेगळा असेल. दहा रुपयांच्या नव्या नोटा चॉकलेटी रंगाच्या असतील व त्या नोटेवर ओदिशा येथील प्रसिद्ध कोणार्क सूर्यमंदिराचे छायाचित्र असेल. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार नव्या नोटांची छपाई सुरू झाली आहे. त्यानंतर दोन महिन्यांत 100 रुपयांच्या नव्या नोटांची छपाई महिन्यांत सुरू होण्याची शक्यता आहे. तोवर 10 रुपयांच्या नव्या नोटांच्या छपाईचे काम पूर्ण झालेले असेल. मात्र 100 रुपयांच्या नव्या नोटेच्या आकारात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे एटीएममधून या नव्या नोटा काढताना कोणताही त्रास होणार नाही.
RBI to shortly issue Rs.10 denomination banknotes. All the banknotes in the denomination of Rs.10 issued by RBI in the earlier series will continue to be legal tender. pic.twitter.com/2tSzRBNLuO
— ANI (@ANI) January 5, 2018
तर गेल्या काही दिवसांपूर्वी 100 रुपयांची नवी नोट चलनात आणण्याची तयारी रिझर्व्ह बँकेने सुरू केली होती. मात्र 100 रुपयांच्या सध्या चलनात असलेल्या नोटा बाद न होता चलनात कायम राहणार आहेत. ही नोट महात्मा गांधी सीरिज-2005 सारख्याच असतील. यासंदर्भात रिझर्व्ह बँकेकडून जारी करण्यात आलेल्य अधिसूचनेत म्हटले आहे की, रिझर्व्ह बँकेकडून लवकरच नव्या बँक नोटा जारी करण्यात येणार आहेत. या नोटा महात्मा गांधी सीरिज-2005 सारख्याच असतील. या नोटांच्या दोन्ही नंबर पॅनलवर इनसेटलेटरमध्ये आर हे अक्षर लिहिलेले असेल. तर नोटांचा छपाई वर्ष 2017 असेल. त्याबरोबरच आरबीआय 50 आणि 20 रुपयांच्या नव्या नोटाही चलनात आणणार आहे. मात्र त्यांच्याही जुन्या नोटा चलनात कायम राहतील.
>पुन्हा एटीएमचे रिकॅलिबरेशन
200 रुपयांच्या नव्या नोटा याआधीच चलनात आल्या असून त्या मोठ्या प्रमाणावर चलनात आणण्याच्याही हालचाली सुरू आहेत. त्यामुळे एप्रिल 2018पासून 200 व 50 रुपयांच्या नव्या नोटा मोठ्या प्रमाणावर चलनात उपलब्ध होतील. त्या एटीएममधून उपलब्ध व्हाव्यात, यासाठी एटीएमचे रिकॅलिबरेशन करण्यात येणार आहे.