- सी. ए. उमेश शर्मा
अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, ३१ डिसेंबर २०१८ ला सुरक्षा सेवासंबंधी काही बदल झाले आहेत का व सध्या ‘चौकीदार’ या शब्दाचा राजकीय जगात खूप वापर होत आहे. जीएसटीही एकप्रकारे चौकीदारच आहे. तर या जीएसटीच्या सेवेतून कररचनेत १ जानेवारी, २०१९ पासून काय बदल झाले आहेत?
कृष्ण (काल्पनिक पात्र): होय अर्जुना, ‘चौकीदार’ हा शब्द सध्या खूप चर्चेत आहे आणि त्यांच्या सेवा देणाऱ्या व घेणाºया दोन्ही करदात्यांना या जीएसटीतील नवीन बदल जाणून घेणे आवश्यक आहे. त्यावर आपण चर्चा करू या ! १ जानेवारीपासून सरकारने करदरासंबंधी काही बदल केले आहेत. त्यानुसार सुरक्षा सेवा पुरविणाºयाला कर भरण्यातून मुक्तता मिळाली आहे. झालेल्या बदलामध्ये सुरक्षा सेवेचा आरसीएम सेवामध्ये समावेश करण्यात आला आहे. म्हणजेच सुरक्षा सेवा प्राप्त करणाºया नोंदणीकृत व्यक्तीला त्यावर आरसीएमअंतर्गत कर भरावा लागेल.
अर्जुन : कृष्णा, अगोदर सुरक्षा सेवांसाठी काय तरतुदी होत्या?
कृष्ण : अर्जुना, सर्व्हिस टॅक्समध्ये सुरक्षा सेवावर आरसीएमअंतर्गत कर भरावा लागत होता, परंतु जीएसटीमध्ये त्याला आरसीएम लागू नव्हता. त्यावर १८ टक्क्याने कराचे पेमेंट करावे लागत होते, परंतु ३१ डिसेंबरच्या अधिसूचनेनुसार आता जीएसटीमध्येही यावर आरसीएम लागू होईल.
अर्जुन : सुरक्षा सेवा पुरवठा करणारासाठी कोणत्या तरतुदी आहेत?
कृष्ण : अर्जुना, सुरक्षा सेवा पुरवठादार जर कंपनी वगळता इतर करदाता असेल आणि त्याने नोंदणीकृत व्यक्तीला सेवा पुरविली, तर त्या प्राप्तकर्त्याला आरसीएमअंतर्गत कराचे पेमेंट करावे लागेल. पुरवठादार कराचे पेमेंट करणार नाही. त्याला प्राप्तकर्त्याला टॅक्स इन्व्हॉइस देता येणार नाही. त्यासाठी बिल आॅफ सप्लाय द्यावे लागेल.
अर्जुन : कृष्णा, सुरक्षा सेवा प्राप्तकर्त्याला काय करावे लागेल ?
कृष्ण : अर्जुना, प्राप्तकर्त्याला सुरक्षा सेवा जर कंपनी वगळता इतर व्यक्तीने सेवा पुरविली, तर प्राप्तकर्त्याला त्यावर आरसीएमअंतर्गत कर भरावा लागेल. प्राप्तकर्त्याला त्याचे आयटीसी घेता येईल.
अर्जुन : कृष्णा, जर कंपनीने सुरक्षा सेवा पुरविली तर काय होईल?
कृष्ण : अर्जुना, जर कंपनीने सुरक्षा सेवा पुरविली, तर त्याला त्यावर १८ टक्के दराने कर भरावा लागेल. या सेवेवर आरसीएम आकारला जाणार नाही, तसेच सेवा पुरवठादाराला टॅक्स इन्व्हॉइस द्यावे लागेल.
>करदात्याने यातून काय बोध घ्यावा ?
करदात्याने सुरक्षा सेवा स्वीकारताना थोडा विचार करूनच स्वीकाराव्या. कारण सरकारने १ जानेवारीपासून त्यावर आरसीएमच्या तरतुदी लागू केल्या आहेत. कायद्यामध्ये वेळोवेळी होणारे बदल लक्षात घेऊनच करदात्याने कर भरावा, नाहीतर करदात्याची सुरक्षा होणार नाही.
चौकीदाराचे काम चोरांना धरण्याचे आहेत, परंतु जीएसटीअंतर्गत लक्ष दिले नाही, तर कर चोरी होऊ नाही, म्हणून चौकीदाराच्या सेवा देणाºयाला सतर्क राहणे गरजेचे आहे.
वस्तू आणि सेवाकराचा नवीन बदल जाणून घेणे आहे आवश्यक
कृष्णा, ३१ डिसेंबर २०१८ ला सुरक्षा सेवासंबंधी काही बदल झाले आहेत का व सध्या ‘चौकीदार’ या शब्दाचा राजकीय जगात खूप वापर होत आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 02:33 AM2019-01-21T02:33:48+5:302019-01-21T02:33:57+5:30