मुंबई - नोकरीच्या शोधात असणा-यांसाठी एक गुड न्यूज आहे. यावर्षी जॉबच्या चांगल्या संधी उपलब्ध होतील असे संकेत मिळत आहेत. मोठया बिझनेस स्कूलमध्ये शिकणा-या विद्यार्थ्यांना कंपन्यांकडून ज्या ऑफर्स मिळतात त्यामध्ये ब-यापैकी सुधारणा झाल्याचे पाहायला मिळत आहे. टॅलेंटेड उमेदवारांना परदेशात प्लेसमेंट आणि मोठया पगाराच्या ऑफर्स मिळत आहेत.
मोठया प्रमाणावर रोजगार निर्मिती करणा-या आयटी क्षेत्राला मागच्यावर्षी मरगळ आली होती. यंदा मात्र आयटीमध्ये मोठया प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल असा अंदाज आहे. आयटी क्षेत्रात दोन लाख नोक-यांची निर्मिती होईल असा अंदाज आहे. एमडीआय, एसपीजेआयएमआर आणि आयआयएफटी या प्लेसमेंट कंपन्यांनुसार यंदा नोक-यांच्या जास्त संधी निर्माण झाल्या आहेत.
गुडगावच्या एमडीआय प्लेसमेंट कंपनीने सांगितले कि, यंदा 119 कंपन्यांमध्ये बॅचमधील सर्वांनाच नोकरी मिळाली. मागच्यावर्षी 143 कंपन्या आल्या होत्या पण अनेकांना रिकाम्या हाताने परतावे लागले होते. नोकरीबरोबर उमेदवारांना घसघशीत पगारही मिळत आहे.