Lokmat Money > बिझनेस न्यूज > आयटी क्षेत्रातील कर्मचारी कमी वेतनवाढीवर नाराज

आयटी क्षेत्रातील कर्मचारी कमी वेतनवाढीवर नाराज

यंदा २ टक्केच वेतनवाढ मिळाल्याचा गैरसमज टीसीएस कर्मचाºयांत पसरला आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:56 AM2018-04-26T00:56:22+5:302018-04-26T00:56:22+5:30

यंदा २ टक्केच वेतनवाढ मिळाल्याचा गैरसमज टीसीएस कर्मचाºयांत पसरला आहे.

IT sector employees angry over wage hikes | आयटी क्षेत्रातील कर्मचारी कमी वेतनवाढीवर नाराज

आयटी क्षेत्रातील कर्मचारी कमी वेतनवाढीवर नाराज

बंगळुरू : यंदा भारतीय आयटी क्षेत्रातील वेतनवाढ कमी असल्याने कर्मचारी नाराजी व्यक्त होत आहे. स्थिर वेतनाऐवजी ‘व्हेरिएबल पे’च्या स्वरूपातील तिमाही बोनस देण्याच्या पद्धतीवरही आयटी कर्मचाऱ्यांत असंतोष आहे.
आघाडीची आयटी कंपनी ‘टीसीएस’ने बाजार भांडवलाचा १00 अब्ज डॉलरचा टप्पा गाठला, तेव्हा कंपनीच्या कर्मचाºयांनी फेसबुकवरील ‘टीसीएस कन्फेशन’ ग्रुपवर लिहिले की, ‘सहकारी टीसीएस कर्मचाºयांचे अभिनंदन. १00 अब्ज डॉलर!! पण वेतनवाढीचे प्रमाण विसरू नका.’ त्यावरील सर्वाधिक लोकप्रिय उपरोधिक प्रतिसाद होता की, ‘वेतनवाढीवर तक्रार करू नका. अ‍ॅट्रिशन रेट (नोकरी सोडण्याचे व भरतीचे प्रमाण) वाढविण्यासाठी कंपनीला मदत करा.’
टीसीएसचे एचआर प्रमुख अजयेंद्र मुखर्जी यांनी सांगितले की, यंदा २ टक्केच वेतनवाढ मिळाल्याचा गैरसमज टीसीएस कर्मचाºयांत पसरला आहे. त्यांना लवकरच वेतनवाढीची पत्रे मिळतील, तेव्हा त्यांना खरी वाढ कळेल. यंदाचा अ‍ॅट्रिशन रेट ११ टक्के आहे. सूत्रांनी सांगितले की, टीसीएसने १२0 टक्के तिमाही बोनस दिला आहे. हा गेल्या दोन वर्षांतील उच्चांक आहे. इन्फोसिसचा तिमाही बोनस १00 टक्के आहे. हा १२ तिमाहींचा उच्चांक ठरला आहे. अ‍ॅट्रिशनचे प्रमाण २0 टक्के आहे. कंपनीने १0 दशलक्ष डॉलरचा विशेष बोनस पूल निर्माण केला आहे. (वृत्तसंस्था)

वाढ इतकी अल्प का?
इन्फोसिसच्या एका कर्मचाºयाने सांगितले की, ‘तिमाही बोनस ही संकल्पनाच धोकादायक आहे. स्थिर वेतनात कंपनी कपात करू शकत नाही. तथापि, अत्यल्प बोनस देऊन कंपनी तुमचे वेतनच एकप्रकारे कापते. काही कर्मचारी तर बोनस पूलमध्ये येतच नाहीत. समभागधारकांना तुम्ही भरमसाट लाभांश देता, मग आमची वेतनवाढ इतकी अल्प का?’

Web Title: IT sector employees angry over wage hikes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.