Join us  

आयटी क्षेत्रातील विक्रीचा सेन्सेक्सला फटका

By admin | Published: October 14, 2015 11:11 PM

भारतीय शेअर बाजारांनी सलग तिसऱ्या दिवशी माना टाकल्या. आयटी क्षेत्रात झालेल्या विक्रीच्या माऱ्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६६.८७ अंकांनी घसरून २६,७७९.६६ अंकांवर बंद झाला

मुंबई : भारतीय शेअर बाजारांनी सलग तिसऱ्या दिवशी माना टाकल्या. आयटी क्षेत्रात झालेल्या विक्रीच्या माऱ्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ६६.८७ अंकांनी घसरून २६,७७९.६६ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही खाली आला.टीसीएसच्या दुसऱ्या तिमाहीतील आकडेवारी गुंतवणूकदारांना आकर्षित करू शकली नाही. त्याआधी इन्फोसिसच्या आकड्यांनीही गुंतवणूकदारांना निराशच केले होते. त्यामुळे आयटी क्षेत्रात विक्रीचा जोरदार मारा सुरू आहे. टीसीएस आणि विप्रो या कंपन्यांचे समभाग अनुक्रमे ४.३९ टक्के आणि 0.४७ टक्के घसरले आहेत. गेल्या तीन दिवसांत सेन्सेक्स ३00 अंकांनी घसरला आहे. हिंदुस्तान युनिलिव्हरचा नफा २.६२ टक्क्यांनी घसरला आहे. त्याचाही फटका बाजारांना बसला. ३0 कंपन्यांचा समावेश असलेल्या सेन्सेक्सची सुरुवातच घसरणीने झाली. या परिस्थितीत फारशी सुधारणा झाली. आयटी क्षेत्रातील कंपन्यांत मोठ्या प्रमाणात विक्री सुरू होती. सत्राच्या अखेरीस सेन्सेक्स ६६.८७ अंकांनी अथवा 0.२५ टक्क्यांनी घसरून २६,७७९.६६ अंकांवर बंद झाला. ५0 कंपन्यांचा समावेश असलेला व्यापक आधारावरील राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २३.८0 अंकांनी अथवा 0.२९ टक्क्यांनी घसरून ८,१0७.९0 अंकांवर बंद झाला. गतिमान ग्राहक वस्तू क्षेत्रातील बडी कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हरचा समभाग १.८५ टक्क्यांनी घसरून ७९७.४0 रुपयांवर आला. क्षेत्रनिहाय विचार करता बीएसई आयटी निर्देशांक सर्वाधिक १.३२ टक्क्यांनी घसरला. त्याखालोखाल टेक, आॅटो, ऊर्जा, पीएसयू आणि मेटल या क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग वाढले. व्यापक बाजारात तेजीचा कल दिसून आला. बीएसई मीडकॅप 0.३४ टक्क्यांनी वाढला. स्मॉलकॅप 0.३५टक्क्यांनी वाढला. आशियाई बाजारांत घसरणीचा कल दिसून आला. चीनमधील महागाईच्या आकडेवारीतून आर्थिक कमजोरी समोर आल्यामुळे चीनमधील बाजार आपटले. त्याचा फटका अन्य आशियाई बाजारांना बसला. युरोपीय बाजारांतही सकाळी घसरणीचा कल दिसून आला. (वृत्तसंस्था)