Lokmat Money > बिझनेस न्यूज > आयटी क्षेत्राने ६० हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना काढले; जगासह भारतातही बसतोय मोठा फटका

आयटी क्षेत्राने ६० हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना काढले; जगासह भारतातही बसतोय मोठा फटका

आयटीत कंत्राटी कामगारांची मागणी ७.७% कमी झाली आहे. आयटी क्षेत्र जागतिक मंदी, निधी आणि बँकिंग संकट यांमुळे अनेक समस्यांशी झुंजत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 08:28 AM2023-05-25T08:28:08+5:302023-05-25T08:28:23+5:30

आयटीत कंत्राटी कामगारांची मागणी ७.७% कमी झाली आहे. आयटी क्षेत्र जागतिक मंदी, निधी आणि बँकिंग संकट यांमुळे अनेक समस्यांशी झुंजत आहे.

IT sector shed 60,000 contract workers; Along with the world, India is also getting hit hard | आयटी क्षेत्राने ६० हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना काढले; जगासह भारतातही बसतोय मोठा फटका

आयटी क्षेत्राने ६० हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांना काढले; जगासह भारतातही बसतोय मोठा फटका

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जागतिक स्तरावर आयटी कंपन्यांमध्ये सध्या मोठी कर्मचारी कपात सुरू आहे. त्याचा फटका भारतीय कंपन्यांनाही बसत आहे. याचा परिणाम कंत्राटी कामगारांवरहीझाला आहे. कंपन्यांनी २०२२-२३ मध्ये ६० हजारपेक्षा अधिक कंत्राटी कामगारांना कामावरून कमी केले आहे.

आयटीत कंत्राटी कामगारांची मागणी ७.७% कमी झाली आहे. आयटी क्षेत्र जागतिक मंदी, निधी आणि बँकिंग संकट यांमुळे अनेक समस्यांशी झुंजत आहे. घरून काम संपल्याने कर्मचारी कार्यालयात परतत आहेत, त्यामुळे कंत्राटी कामगारांची मागणीही कमी होत आहे.

महिन्याचा पगारही कमी झाला
    सेक्टर     २०१७-१८     २२-२३
    आदरातिथ्य     २७,०००     १८,७००
    मीडिया     ३२,०००     ३१,७००
    दूरसंचार     २४,०००     २४,७००
    ऑटोमोबाइल     २५१००     २५००० 
    ई-कॉमर्स     २८,२००     २४,७००
(भारतीय कर्मचाऱ्यांच्या सरासरी मासिक पगाराची रक्कम रुपयात)

Web Title: IT sector shed 60,000 contract workers; Along with the world, India is also getting hit hard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :jobनोकरी