Lokmat Money > बिझनेस न्यूज > ...तेथेच अदानी यांनी दिले शिक्षकदिनी व्याख्यान, २२० अब्ज डॉलर उद्योगचा उलगडला प्रवास

...तेथेच अदानी यांनी दिले शिक्षकदिनी व्याख्यान, २२० अब्ज डॉलर उद्योगचा उलगडला प्रवास

Gautam Adani प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांना १९७७ मध्ये मुंबईतील नामांकित कॉलेजने प्रवेश नाकारला होता. त्यामुळे ते पुढे शिक्षण घेऊ शकले नव्हते. त्यानंतर व्यवसायाकडे वळत मागील साडेचार दशकांत २२० अब्ज डॉलरचा उद्योग समूह उभा करण्याची किमया साधली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2024 01:06 PM2024-09-07T13:06:41+5:302024-09-07T13:07:18+5:30

Gautam Adani प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांना १९७७ मध्ये मुंबईतील नामांकित कॉलेजने प्रवेश नाकारला होता. त्यामुळे ते पुढे शिक्षण घेऊ शकले नव्हते. त्यानंतर व्यवसायाकडे वळत मागील साडेचार दशकांत २२० अब्ज डॉलरचा उद्योग समूह उभा करण्याची किमया साधली.

...It was there that Adani delivered the Teacher's Day lecture, an unfolding journey of a 220 billion dollar industry | ...तेथेच अदानी यांनी दिले शिक्षकदिनी व्याख्यान, २२० अब्ज डॉलर उद्योगचा उलगडला प्रवास

...तेथेच अदानी यांनी दिले शिक्षकदिनी व्याख्यान, २२० अब्ज डॉलर उद्योगचा उलगडला प्रवास

 मुंबई -  प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांना १९७७ मध्ये मुंबईतील नामांकित कॉलेजने प्रवेश नाकारला होता. त्यामुळे ते पुढे शिक्षण घेऊ शकले नव्हते. त्यानंतर व्यवसायाकडे वळत मागील साडेचार दशकांत २२० अब्ज डॉलरचा उद्योग समूह उभा करण्याची किमया साधली. ज्या कॉलेजने त्यांना प्रवेश नाकारला, त्याच कॉलेजमध्ये शिक्षकदिनानिमित्त व्याख्यान देण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले.

जय हिंद कॉलेजमध्ये अदानी यांचे ‘ब्रेकिंग बाउंडरीज: द पॉवर ऑफ पॅशन ॲण्ड अनकन्वेशनल पाथ्स टू सक्सेस’ या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी जय हिंद कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेचे अध्यक्ष विक्रम नानकाणी यांनी अदानी यांची ही वेगळी ओळख करून दिली. गौतम अदानी हे १९७० च्या दशकात वयाच्या १६ व्या वर्षी मुंबईतील हिरे बाजारात हिरे सॉर्टर म्हणून आले होते. 

जडणघडणीतील अनेक  पैलूंचा केला उलगडा
- विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अदानी यांनी त्यांच्या जडणघडणीतील अनेक पैलूंचा उलगडा केला. शिक्षण सोडून मुंबईतील काहीशा अनिश्चित भविष्याकडे जाण्याचा मार्ग निवडण्यामागे काही बाबी आहेत. 
- मला लोक अजूनही विचारतात, तू मुंबईला का गेलास? तू तुझे शिक्षण का पूर्ण केले नाहीस? मात्र जे तरुण सीमांना अडथळे म्हणून नव्हे तर त्यांच्या धैर्याची परीक्षा घेणारी आव्हाने म्हणून पाहतात, अशा स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक तरुणाच्या हृदयात याचे उत्तर दडलेले आहे. 
-आपल्या देशातील ‘मोस्ट हॅपनिंग सिटी’त माझे जीवन घडवण्याचे धैर्य माझ्यात आहे की नाही, हे पाहण्यासाठी मी मुंबईत आलो. याच शहरात हिऱ्यांची वर्गवारी आणि व्यापार करायला शिकलो. हे माझ्या व्यवसायासाठीच्या प्रशिक्षणाचे ठिकाण होते, असेही अदानी यांनी नमूद केले. तसेच त्यांनी उभ्या केलेल्या साम्राज्याच्या जडणघडणीचा प्रवासही कथन केला. 

Web Title: ...It was there that Adani delivered the Teacher's Day lecture, an unfolding journey of a 220 billion dollar industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.