Lokmat Money > बिझनेस न्यूज > NFO:  केवळ ५ हजार गुंतवून मिळू शकेल मोठा नफा; गुंतवणूकीसाठी उघडला नवा पर्याय

NFO:  केवळ ५ हजार गुंतवून मिळू शकेल मोठा नफा; गुंतवणूकीसाठी उघडला नवा पर्याय

ITI Value Fund: ITI म्युच्युअल फंड एक नवीन फंड ऑफर (NFO), आयटीआय़ व्हॅल्यू फंड सुरू करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 04:27 PM2021-05-25T16:27:27+5:302021-05-25T16:29:22+5:30

ITI Value Fund: ITI म्युच्युअल फंड एक नवीन फंड ऑफर (NFO), आयटीआय़ व्हॅल्यू फंड सुरू करत आहे.

iti mutual fund launched value fund nfo you can start investment with min 5000 rs check all details | NFO:  केवळ ५ हजार गुंतवून मिळू शकेल मोठा नफा; गुंतवणूकीसाठी उघडला नवा पर्याय

NFO:  केवळ ५ हजार गुंतवून मिळू शकेल मोठा नफा; गुंतवणूकीसाठी उघडला नवा पर्याय

HighlightsITI म्युच्युअल फंड एक नवीन फंड ऑफर (NFO), आयटीआय़ व्हॅल्यू फंड सुरू करत आहे.८ जूनपर्यंत गुंतवणूक करण्याची मिळणार संधी.

ITI Value Fund: आयटीआय म्युच्युअल इंड एक नवी फंड ऑफर (NFO), आयटीआय व्हॅल्यू फंड सुरू करत आहे. २५ मे २०२१ पासून ८ जून २०२१ पर्यंत हा फंड सुरू राहणार आहे. या फंडमध्ये किमान ५ हजार रूपये अॅप्लिकेशन रक्कम आहे. त्यानंतर एका रुपयाच्या गुणाकारात गुंतवणूक करता येऊ शकते. आयटीआय व्हॅल्यू फंड एक ओपन एन्डेड इक्विटी स्कीम आहे आणि ती इक्विटी, तसंच इक्विटीशी संबंधित इंस्ट्र्रूमेंट्सच्या पोर्टफोलियोमध्ये गुंतवणूक करेल. आयटीआय म्युच्युअल फंड हाऊसचा हा बारावा फंड आहे. यांपूर्वी आयटीआयनं म्युच्युअल फंड बाजारात ११ मुख्य गुंतवणूकीचे प्रोडक्ट लाँच केले आहेत. त्याचा गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे.
 
"हे फंड हाऊस त्याच्या गुंतवणूकदरांना स्थापनेपासूनच गुंतवणूकीचा अनोखा अनुभव देत आहे. व्हॅल्यू फंड्सद्वारे, आमचे लक्ष्य निरंतर आधारावर दीर्घ मुदतीत जोखीम-समायोजित परतावा देण्याची क्षमता असलेल्या कमी-मूल्याच्या समभागांची ओळख करुन दीर्घकालीन भांडवली नफा मिळविणे हे आहे," अशी प्रतिक्रिया नवीन एनएफओच्या लाँचदरम्यान आयटीआय म्युच्युअल फंडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि मुख्य गुंतवणूक अधिकारी (CIO) जॉर्ज हॅबर जोसेफ यांनी दिली. 

कोणी करावी गुंतवणूक

दीर्घकालीन गुंतवणूकीद्वारे ज्यांना चांगले उत्पन्न मिळवायचे आहे त्यांच्यासाठी ही योजना अधिक चांगली असल्याचे सिद्ध होऊ शकते. तसंच जे व्हॅल्यू ओरिअंटेड इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटजीचं पालन करतात त्यांच्यासाठीही हे उत्तम आहे. आम्ही टी ३० शहरांवर आणि काही बी ३० ठिकाणी लक्ष केंद्रित करत आहोत, जिथून आम्हाला गुंतवणूकदारांकडून चांगला पाठिंबा मिळाला आहे. आम्ही आमच्या गुंतवणूकदारांना चांगल्या गुंतवणूकीची साधने देण्यासाठी सतत प्रयत्न करत आहोत, असं जॉर्ज हेबर म्हणाले. 

आतापर्यंत या स्कीम लाँच

आतापर्यंत आयटीआय म्युच्युअल फंडनं आयटीआय मल्टी कॅप फंड, आयटीआय लाँग टर्म इक्विटी फंड (ईएलएसएस- टॅक्स सेव्हिंग फंड), आयटीआय आर्बिट्रेज फंड, आयटीआय लिक्विड फंड, आयटीआय ओवरनाइट फंड, आयटीआय बॅलन्स्ड अॅडव्हांटेज फंड, आयटीआय स्मॉल कॅप फंड, आयटीआय बँकिंग आणि पीएसयू डेट फंड, आयटीआय लार्ज कॅप फंड, आयटीआय मिड कॅप फंड आणि आयटीआय अल्ट्रा शॉर्ट ड्यूरेशन फंड सारख्या योजना लाँच केल्या आहेत.

Web Title: iti mutual fund launched value fund nfo you can start investment with min 5000 rs check all details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.