जर आपण अद्यापही टॅक्स भरलेला नसेल, तर तत्काळ भरून घ्या. कारण इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै, अशी आहे. सरकारने याची अंतिम तारिख वाढवण्यास स्पष्ट नकार दिला आहे. यासंदर्भात बोलताना महसूल सचीव म्हणाले, 31 जुलै नंतर ITR भरण्याची तारीख वाढविण्याचा सध्या कुठलाही विचार नाही. आर्थिक वर्ष 2021-22 आणि अॅसेसमेंट ईयर 2022-23 साठी इनकम टॅक्स रिटर्न ( Income Tax Return) भरण्याची सुरुवात 15 जून, 2022 पासूनच सुरू झाली आहे.
जर आपल्यालला आपल्या ऑफीसकडून फॉर्म-16 (Form -16) मिळाला असेल तर, उशीर न करता तो तत्काळ भरून टाका. जर आपण शेवटच्या तारखेपूर्वी हा फॉर्म भरला नहा, तर आपल्याला पेनल्टी द्यावी लागू शकते. याशिवाय, जेव्हा इनकम टॅक्सच्या ई-फायलिंग ( Income Tax E-Filing) वेबसाइटवर अधिक टॅक्सपेयर्स ( Taxpayers) रिटर्न फायलिंग करण्यासाठी येतात. तेव्हा तिच्यावरील लोड वाढतो आणि नाहक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यापासून वाचण्यासाठी शेवटपर्यंत वाट पाहत बसू नका.
31 जुलैपूर्वी भरा रिटर्न -
महत्वाचे म्हणजे आर्थिक वर्ष 2021-22 आणि अॅसेसमेंट इयर 2022-23 साठी कुठल्याही लेटफीस शिवाय आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै, 2022 आहे. डेडलाइननंतर, इनकम टॅक्स रिटर्न दाखल केल्यास आपल्याला इनकम टॅक्सच्या सेक्शन 234A आणि अंडर सेक्शन 234F अंतर्गत पेनल्टीसह टॅक्सवर व्याजही भरावे लागेल.
ITR भरण्याची सविस्तर डेडलाइन -
पर्सनल HUF साठी आयकर रिटर्न भरण्याची अखेरची तारीख 31 जुलै, 2022 आहे. तर, ज्या लोकांना ऑडिट करावे लागते त्यांच्यासाठी आखेरची तारीख 31 ऑक्टोबर, 2022 आहे. तसेच ज्या लोकांचा बिझनेस आहे आणि ज्यात टीपी रिपोर्टची आवश्यकता असते, त्यांच्यासाठी आयकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर, 2022 अशी आहे.